Home » राजकारण » संविधान संरक्षणासाठी अ‍ॅड.आंबेडकरांना साथ द्या- डोंगरे.

संविधान संरक्षणासाठी अ‍ॅड.आंबेडकरांना साथ द्या- डोंगरे.

संविधान संरक्षणासाठी अ‍ॅड.आंबेडकरांना साथ द्या- डोंगरे
डोंगरचा राजा / आँनलाईन
संघप्रणित भाजप सत्तेत आल्यापासून परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्‍या माणसांची मुडदे पाडण्याची मालिका सुरू झालेली आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी केली जात आहे. विद्यार्थी चळवळींचा आवाज दाबला जात आहे. संघी सरकार संविधानीक व्यवस्था मुळासहीत नष्ठ करून मनुस्मृतीवर आधारीत नवपेशवाई आनु पाहत आहे, ही प्रतिक्रांतीची सुरूवात आहे. संघी सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासठी आंबेडकरी चळवळींनी संविधानाच्या संरक्षणसाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी. असे परिवर्तनवादी विचार भारिप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतिनिमित्त बीड- हिवरा पहाडी, कुक्कडगाव, घाटजवळा, मांजरसुंबा, मैदा, मौज, केज-फुलेनगर, पाटोदा-धनगर जवळका,गेवराई-रांझणी, माजलगाव-उमरी, पिंपळगाव, छोटेवाडी, बाभळगाव, राजेवाडी, वांगी, वडवणी-कोठरबन,पिंपरखेड, मोरवड, परळी-हेळंब, वाघाळा, टोकवाडी, अंबाजोगाई-कुंबेफळ, सोनवळा, धारूर-आरणवाडी, चोरंबा, चारदरी, हिंगणी (खु.), कासारी, मोहखेड, आमला आदी ठिकाणच्या गावांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करताना अनिल डोंगरे म्हणाले की, आंबेडकरी समुहाने बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये केवळ डीजे, संगीत रजणीसह सांसकृतिक कार्यक्रमामध्ये दंग कदापीही राहता कामा नये.कारण याचा फायदा घेत देशाच्या सत्तेत जावून बसलेल्या संघ प्रणित भाजप सरकारने संविधान संपविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळींनी आता तरी गाफील राहू नये.ज्या संविधानाने माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते संविधानच जर संपून गेले तर फार मोठी हाणी होणार आहे.त्याचा आपण विचार करू शकणार नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक संघर्षातून निर्माण करून दिलेली समता, स्वतंत्रता आणि बंधुता अभादीत ठेवायची असेल तर आंबेडकर चळवळींना आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी लागणार आहे. कारण आंबेडकरी चळवळींना तोच एकमेव पर्याय उरला आहे. संघी सरकारने क्रांतीकारी चळवळींचा आवाज दाबण्याचे काम सुरू केलेले आहे. विषमतावादी विचारधारेच्या लोकांकडून प्रत्येक दिवसी आंबेडकरी चळवळींच्या विरोधात प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळींनी सावध राहिले पाहिजे. असे आवाहन आंबेडकरी चळवळींना अनिल डोंगरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.