Home » महाराष्ट्र माझा » यापुढे कोणालाही भाऊ मानणार नाही -ना. मुंडे

यापुढे कोणालाही भाऊ मानणार नाही -ना. मुंडे

यापुढे कोणालाही भाऊ मानणार नाही -ना. मुंडे
डोंगरचा राजा ऑनलाइन | Updated:
रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डाववल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका सोसावा लागणार आहे. रमेश कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेले नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवारी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती.
मागील तीन निवडणुकांत या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. आता लढत देण्याइतपत मतदारसंख्या आमच्याकडे निर्माण झाली आहे. पूर्वी बळ नव्हते. आता ते वाढले आहे आणि सुरेश धस यांच्यासारखा बलाढ्य उमेदवार मिळाल्यामुळे या निवडणुकीत चांगली लढत होईल. यातून भाजपा नक्की यश संपादन करेल. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अन्य कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाहीत. मात्र त्यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्यात सर्व आलबेल आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पवार नव्हे दलाल चालवतात!

राष्ट्रवादी पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. आता पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार पक्ष चालवित नसून तोडपाणी करणार्‍या दलालांच्या हातात पक्षाची सुत्रे गेली आहेत. अशा शेलक्या शब्दांत माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टिकास्त्र सोडले. गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभे ठाकण्याची राष्ट्रवादीमध्ये कोणातच धमक नव्हती. त्यावेळी आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढविली. परभणीत बाबाजानी दुर्राणी यांचा बळी दिला. तर उस्मानाबादेत अशोक जगदाळे यांना उमेदवार म्हणून नुसतेच फिरविले. रमेश कराड यांना उमेदवारी देण्याचा नक्की निकष काय, असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published.