भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड-धाराशीव-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव निश्चित झाले आहे. उद्या धाराशिवमध्ये ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडनाट्याच्या वेळेस आपल्या सदस्यांच्या माध्यमातून थेट भाजपाला मदत करत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणणारे माजी मंत्री सुरेश धस यांना बक्षीस म्हणून बीड-धाराशिव-लातूर स्थानिक स्वराज्य मतदार संघाची उमेदवारी दिली. माजी मंत्री सुरेश धस हे राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे निकटवृत्तीय म्हणून मानले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलाहाला कंटाळून सुरेश धस यांनी भाजपाला जवळ केले. विधान परिषदेसाठी सुरेश धस आपला उमेदवारी अर्ज उद्या धाराशिव येथे जावून दाखल करणार आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर, तीन जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत. सुरेश धस यांचा भाजपामध्ये प्रवेश केव्हा होणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.