Home » माझा बीड जिल्हा » बीड च्या कलेक्टर नी दिला १ दिवसाचा पगार.

बीड च्या कलेक्टर नी दिला १ दिवसाचा पगार.

बीड च्या कलेक्टर नी दिला १ दिवसाचा पगार.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना संकट काळात तातडीने आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पत्रकार कल्याण निधी ही संकल्प राबविण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कल्याण निधीसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर पत्रकारांबरोबरच लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी यांनी जमेल तशी आर्थिक मदत केली आहे. आता प्रशासनातील अधिकारी देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी देखील नुकताच आपला एक दिवसाचा पगार पत्रकार आरोग्य निधीसाठी दिला असून सध्या आरोग्य निधीसाठी सर्वच स्तरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे.
पत्रकार बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम असते. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांवर काही संकट ओढवल्यास आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना विविध आडचणींचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार कल्याण निधी उभारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. परिषदेच्या पदाधिकारी यांनी पत्रकार कल्याण निधी जमा करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत खाते उघडले आहे. या खात्यावर सर्व पत्रकरांबरोबरच समाजातील विविध घटकातील व्यक्तीने जमेल तशी आर्थिक मदत करण्याचे आवाहन मराठी परिषदेच्या वतीने केेल्यानंतर जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघ, लोकप्रतिनिधी, व्यापारी व उद्योजक, विविध सामाजिक संघटनेने मदत केली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, आ. जयदत्त क्षीरसागर, विश्वनाथ माणूसमारे, रामचंद्र जोशी, सुरेश लगड, स्मिता चौरे, प्रमोद पुसरेकर, करपे, श्रीराम जाधव यांच्यासह इतरांनी आत्तापर्यंत मदत केली असून बुधवारी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पत्रकारांच्या आरोग्य निधीसाठी आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. पत्रकार आरोग्य निधीसाठी सर्वच स्तरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आर्थिक मदत केलेल्या सर्वांचे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विलास डोळसे, विशाल सांळूके, उत्तम हजारे, सुनिल क्षीरसागर, अशोक खाडे, व्यंकटेश वैष्णव, सुधाकर सोनवणे, संजय धुरंधरे, प्रदिप मुळे, संदिप बेदरे, अक्षय कांकरिया आदीं पदाधिकारी, सदस्य यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.