ढाकेफळचा सदानंद थोरात एमपीएस्सी परीक्षेत उतीर्ण
डोंगरचा राजा/आँनलाईन
केज तालुक्यातील मौजे ढाकेफळ येथील सदानंद गुलाबराव थोरात हा MPSCच्या STI परिक्षेत नाविण्यपुर्ण गुण घेवुन यश संपादन केल्याने पुण्याच्या सदाशिव पेठात व ढाकेफळ या गावी युवक मित्रांणी मोठा जल्लोष केला.
केज तालुक्यातील मौजे ढाकेफळ येथील सदानंद गुलाबराव थोरात याने MPSC STI परिक्षेत नाविन्यपुर्ण गुण घेवुन उतीर्ण झाला.प्रथमथा बाल वयापासुनच शिक्षनाची आवड व भविष्यात आॅफीसर होण्याची जिद्द मनात बाळगुन रात्रन दिवस आभ्यास एेके अभ्यासच करण्याची धमक मनात बाळगली.
चौथी पर्यंत शिक्षण गावातील जि.प.शाळेत व नंतर केजच्या रामराव पाटील माध्यमिक विद्यालय.खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई व पदविचे शिक्षण वसंत महाविद्यालयात घेतले.
सदानंद गुळाब थोरात हे शेतकरी कुटुंबातील अभ्यासु विध्यार्थी घरची परिस्थीती बेताची असतांनाही शेतीवरील खर्च व मुलांचे शिक्षणाचा खर्च पेलवत नसतांनाही मुलाला आॅफीसर बनवण्याची व आई- वडीलांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी सदानंदही मागे न राहता तो आज आॅफीसर झाल्याने थोरात परिवार मोठ्या प्रमानात आनंद साजरा करत आहे.
नाविन्यपुर्ण यश संपादन केल्या बद्दल माउली विद्यापिठ केजचे संस्थापक माजीमंत्री आशोकराव पाटील.मा.खा.रजनी पाटील,
आ.संगीताताई ठोंबरे.रा.कॉ.पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवने.रमेशराव आडसकर.डॉ.अशोक थोरात.प्राचार्य लक्ष्मण डोईफोडे.प्रा.रोहीनी काळे.प्राचार्य फावडे सर.प्रा.हनुमत भोसले.यानी सदानंद थोरात यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.