Home » महाराष्ट्र माझा » नामच्या पोकलेनला शेतकऱ्यांनी दिला निरोप.

नामच्या पोकलेनला शेतकऱ्यांनी दिला निरोप.

नामच्या पोकलेनला शेतकऱ्यांनी दिला निरोप.
डोंगरचा राजा / आष्टी
आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गावात नाम फाऊंडेशनची टू टेन मशीन जोरात चालली. एकीकडे नदी रुंदीकरणाचे काम झपाट्याने झाले. उकरलेले नदी पात्र मोठे दिसत असल्याने आता पाणी भरपूर साठणार ही बाब ग्रामस्थांना आनंद देत आहे. नदीतील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकला. जमीन काळी झाली. त्यामुळे त्यांच्यात आणखी उत्साह निर्माण झाला आहे.
पोकलेन मशिनने नदी खोलीकरणाचे काम करत असताना या गावाची पूर्ण तालुक्यात चर्चा झाली आहे. परिसरातील गावातील अनेक लोक हे काम पहायला येत आहेत. विकास समोर दिसत असल्याने आणि पाणी टंचाईचा मुद्दा संपणार असल्याने प्रत्येक शेतकरी यात हिरीरीने भाग घेत होता. त्यामुळे गावात आणखी परिवर्तन झालेले दिसणार आहे. नदी खोल झाल्यानंतर नदीत असलेल्या बंधाऱ्यांपैकी काही ठिकाणी अजून पाणी कसे रोखल्या जाईल याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता रोखले जाणारे पाणी गावकऱ्यांना जून महिन्यात डोळ्याचे पारणे फेडायला लावणार आहे.
काल काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशिनचे पूजन करून जणू काही घरचा कोणी पाहून परदेशात जात असल्याप्रमाणे भावपूर्ण निरोप दिला. नाम मुळे शेतकरी एकवटला. कोणाचाही आधार न घेता स्वतः सहभाग घेतला की काम मार्गी लागते. हे शेतकऱ्यांनी जाणून घेतले आहे. लोक सहभाग आणि मनातून काम करण्याची जबरदस्त इच्छा झाली की, विकास होतो, ही बाब गावकऱ्यांना समजली. नाम मुळे गावकऱ्यामधील उत्साह, लोक सहभाग, लोक जागृती झाली आणि हीच खरी कमाई झाली. मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर गावातील जनता खुश झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.