Home » माझा बीड जिल्हा » आ.क्षीरसागर प्रादेशिक पातळीवर सक्रीय.

आ.क्षीरसागर प्रादेशिक पातळीवर सक्रीय.

आ.क्षीरसागर प्रादेशिक पातळीवर सक्रीय.
डोंगरचा राजा आँनलाईन / बीड
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर असलेले आ. जयदत्त क्षीरसागर हे प्रादशिक कार्यक्रमात सक्रीय असल्याने वरीष्ठ पातळीवर सर्व काही ठिकठाक असल्याचे जाणवून देत आहेत. यापुर्वीही रा.कॉ.च्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान त्यांनी बीड जिल्हा वगळून उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे हजेरी लावली होती. जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहत असल्याने पक्षाला घेऊन उलट-सुलट चर्चा होत असतानाच आ. क्षीरसागर वरीष्ठांच्या कार्यक्रमात हजेरी लावून वेगवेगळ्या वावड्यांना पूर्णविराम देत आहेत. हल्लाबोल नंतर परवाच येथील राष्ट्रवादी भवन येथे भटक्या विमुक्त जातीचे हरीदास राठोड यांची पत्रकार परिषदही पार पडली मात्र आ. क्षीरसागर राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नसल्यागत त्यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी केला नव्हता. तर दुसरीकडेशहर खड्डेमुक्त यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आ.क्षीरसागर यांनी विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे कसा पाठपुरावा लागतो हे ठासून सांगितले परंतु कार्यक्रमाच्या ठिाकणी ना पक्षाचा झेंडा ना चिन्ह. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षापासून दुरावलेले आ.क्षीरसागर आज पुणे येथील बैठकीत थेट वरीष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्यांच्यावर पक्षाने कोणती जबाबदारी दिली नसली तरी त्यांच्या उपस्थितीनेच पुन्हा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.