Home » महाराष्ट्र माझा » आता शांततेत आंदोलने होणार नाहीत!

आता शांततेत आंदोलने होणार नाहीत!

आता शांततेत आंदोलने होणार नाहीत!

डोंगरचा राजा | Updated:

– मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार केवळ चालढकल करत आहे. दिखावू आश्वासने देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही. मंत्री उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडण्याचे काम करत आहेत. यामुळे यापुढे मूकमोर्चे काढण्यात येणार नाहीत. शांततेत निवेदने देण्यात येणार नाहीत, तर आता आक्रमक होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. भविष्यात मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील, असा इशाराही क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी देण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, माणिकराव शिंदे आदींनी याबाबत  माहिती दिली. यावेळी मराठा मोर्चानंतर सरकारने जे शासन निर्णय काढले होते, त्याच्या प्रतीही यावेळी फाडण्यात आल्या. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मूकमोर्चे निघाले. मुंबईत विधिमंडळ अधिवेशन असताना ९ ऑगस्ट रोजी महामोर्चा निघाला होता. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन विविध घोषणा केल्या होत्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमितीदेखील स्थापन करण्यात आली. मात्र ठोस असे काहीच पदरात पडले नाही. आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर सरकार चालढकल करत आहे. जे काही शासननिर्णय निघाले ते आर्थिकदृष्टय़ा मागासांसाठी निघाले. यापैकी एकातही मराठा समाज अशी नोंद नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत. ते मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्?न करत आहेत. चळवळ मोडीत काढण्याचा त्?यांचा प्रयत्?न असल्याने त्यांना  उपसमितीतून हटविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच १ मे ते ५ जून दरम्यान राज्यभरात बैठका, सभा, आक्रोश मेळावे होणार आहेत. त्यात मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. आमदारांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.