Home » देश-विदेश » वड़वणीचा भुमीपुत्र कलेक्टर झाला.

वड़वणीचा भुमीपुत्र कलेक्टर झाला.

वड़वणीचा भुमीपुत्र कलेक्टर झाला.

डोंगरचा राजा आँनलाईन /वड़वणी
वड़वणी चे भुमीपुत्र सिए प्रकाशसेठ नहार यांचे चिरंजीव प्रणय नहार यांनी नुसत्याच झालेल्या युपीएससी परक्षेत घवघवीत यश संपादन करत देशात 199 वा रॅक मिळविला असुन ते कलेक्टर झाले असुन बीड़ जिल्हाच्या शिरपेचार मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी घवघवीत यश संपादन केल्या बद्दल वड़वणी तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. प्रणय नहार यांनी शालेय शिक्षण संस्कार विद्यालय बीड़ येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेत त्यांनी चॅर्टर ऑकाउंट ही पदवी मिळविली. मात्र त्यात त्यांचे मन रमन नसल्याने त्यांनी युपीएससी चे चॅलेंज स्विकारले दोन वर्षं कठोर मेहनत घेत यशाला गवसणी घातली. असुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दै. पार्वभुमी शी बोलतांना ते म्हणाले की मी सिए ची ड़िग्री मिळवली. मात्र मला चॅलेंज स्विकारायला आवड़ते म्हणुन मी युपीएससी चा मार्ग स्विकारला व दोन वर्षात यश मिळवले असुन आता माझे देशसेवा करण्याचे स्वप्न साकार झाले असुन ऐवढ्यावरच न थाबंता आय एस करीता मी प्रयत्न करणार असुन माझ्या यशामाघे वड़ील प्रकाश नहार,आई सौ. प्रमिला नहार
यांचा सिंहाचा वाटा आहे.माझ्या नातेवाईकांनी मला बळ दिले माझ्यापाठीशी खंबीरपणे उभे राहीले तसेच माझे आजोबा स्व. हिरालालजी नहार व आजी सुरजबाई नहार् आशीर्वादच्या बळावर मि जीवनात यशस्वी झालो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.त्यांच्या या घवघवीत यश बद्दल विनोदकुमार नहार. ड़ाॅ. पारसमलजी नहार. माणीकचंदजी नहार. राजमल नहार. वैभव नहार. नगरसेवक विनयसेठ नहार. विवेक नहार. प्रशांत नहार.प्रतिक नहार. ड़ाॅ धिरज नहार सह तालुक्यातील तमाम जनतेने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.