Home » माझा बीड जिल्हा » रुग्णच शोधतोय खड्ड्यातुन वाट -अॅड.देशमुख

रुग्णच शोधतोय खड्ड्यातुन वाट -अॅड.देशमुख

रुग्णच शोधतोय खड्ड्यातुन वाट -अॅड.देशमुख
आष्टी / डोंगरचा राजा आँनलाईन
तालुक्यातील कडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या रस्त्याची मागील दहा वर्षापासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांना अक्षरशः खड्ड्यातून वाट शोधावी लागत आहे. विशेषतः दवाखान्यात तपासणी व प्रसुतिसाठी येणा-या गर्भवती महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
आष्टी तालुक्यातील कडा हे मोठ्या बाजारपेठेचं गाव असल्यामुळे आजुबाजुच्या वीस ते पंचवीस गावांचा याठिकाणी दैनंदिन संपर्क असतो.सध्या उन्हाचा प्रचंड चटका वाढल्याने विविध आजाराने डोकं वर काढलं असल्याने रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.तर दुसरीकडे खाजगी वैद्यकीय सेवा सामान्य गोरगरिब रूग्णाच्या आवाक्याबाहेर असल्याने परिसरातील बहुसंख्य रूग्णांसाठी मुख्य रस्त्यावर असलेले कडा प्राथमिक आरोग्य वरदान ठरत आहे.त्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी येणा-या स्थानिक परिसरातील रूग्णांची मोठी वर्दळ असते.परंतु दवाखान्यातील उपचारापेक्षा रस्त्याचं दुखणं सध्या असह्य बनले आहे. मागील दहा वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः बिकट अवस्था झाली आहे.या रस्त्याच्या समस्येबाबत नागरीकांनी अनेकदा राजकीय पुढा-यांकडे तक्रारी केल्यात.मात्र एकाही नेत्यानी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.त्यामुळे रूग्णांसह नागरीकांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.विशेष करून रस्त्याचा सर्वाधिक त्रास दवाखान्यात तपासणी व प्रसुतिसाठी येणा-या महिलांना सोसावा लागत आहे.
—————————————
पाठपुरावा करणार
– अॅड. अजित देशमुख
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अॅड,अजीत देशमुख यांनी नुकतीच कडयाला भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करून तीव्र संताप व्यक्त केला.हा रस्ता दुरूस्तीसाठी आपण स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिनिधीला सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.