Home » माझा बीड जिल्हा » सानप यांची महासंचालक पदकाला गवसणी.

सानप यांची महासंचालक पदकाला गवसणी.


सानप यांची महासंचालक पदकाला गवसणी.

▪ सानप यांचा तपासात हातखंडा

 बीड / डोंगरचा राजा आँनलाईन 

स्थानिक गुन्हा शाखेत मागील तीन वर्षांपासुन कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल परमेश्‍वर सानप यांची यावर्षीच्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हासाठी निवड झाली आहे. 26 वर्षांच्या सेवेत सानप यांनी नाविण्यपूर्ण आणि वेगवेगळ्या पध्दतीने काम करुन पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले असुन आतापर्यंत त्यांनी 380 बक्षीसे 7 प्रशस्तीपत्रके मिळवली आहेत. कौशल्यपूर्ण शास्त्रोक्त पध्दतीने गुन्ह्यांचा तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाराष्ट्र दिनी त्यांना महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

बीड जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेत मागील तीन वर्षांपासुन कार्यरत असलेलेे पोलिस हेड काँन्स्टेबल परमेश्‍वर सीताराम सानप(रा.खडकवाडी ता.पाटोदा) यांची पोलिस दलात तब्बल 26 वर्ष 9 महिने सेवा झाली असुन या काळात त्यांनी गुन्ह्यांच्या तपासात कौशल्यपूर्ण व शास्त्रोक्त पध्दतीने काम केल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली. यात प्रामुख्याने बीड शहरातील चौरे वस्तीवरील अवैधरित्या विदेशी बनावट दारुचा कारखान्यावर धाड, अंबाजोगाई येथे कार्यरत असताना खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षेपर्यंत पोहचवले. मांजरसुंबा येथे ट्रकसह सात क्विंटल गांजा पकडण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. तर राज्यभर गाजलेल्या परळी तालुक्यातील बेकायदेशीर अफुची लागवड गुन्ह्यातही आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी सानप यांनी सबळ पुरावे आणि शास्त्रोक्त पध्दतीने तपास केला. यासह वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये नाविण्यपूर्ण पध्दतीने त्यांनी कामगिरी बजावली. तर या कालावधीत त्यांनी 380 बक्षीस आणि 7 प्रशस्ती पत्रके मिळवून पोलिस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळातील एकूण कामगिरीचा आणि पंधरा वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल यावर्षीच्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हासाठी त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र दिनी त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक घनशाम पाळवदे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.