Home » माझा बीड जिल्हा » साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा- मोहन जगताप

साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा- मोहन जगताप

साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा- मोहन जगताप.

-प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार.

 माजलगाव -रविकांत उघडे

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने जय महेश कारखाना अत्यंत महत्वाचा असुन मी कारखाना प्रशासनाच्या व एम. डी यांच्या संपर्कात असुन साखरेच्या भावात घसरण झाल्यामुळे अडचण झाली आहे. परंतु इतर पर्याय काढुन शेतकऱ्यांचे ऊसाचे बिले व ऊस ठेकेदार यांचे बिले द्यावे यासाठी तोडगा काढावा व शेतकऱ्याने कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांनी केले आहे.

ज्या वेळेस तालुक्यातील शेतकरी अडचणीत होता त्यावेळेस जय महेश कारखान्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला सहकार्य केले आहे. आता शेतकऱ्याने संयम ठेऊन कारखान्याला सहकार्य करावे .तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जय महेश कारखाना अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेकांनी कारखाना अडचणीत यावा यासाठी प्रयत्न केले. परंतु कारखाना प्रशासन अडचणी वर मात करण्यासाठी सक्षम आहे. ऊस बिले पुढील महिन्यात पुर्ण अदा करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे.पुढील वर्षी तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे त्यामुळे जय महेश कारखाना सुरू राहणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.