शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन- ना.पंकजा मुंडे
मुंबई/ डोंगरचा राजा आँनलाईन
राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. शिवाय दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
निर्णयाचा या शिक्षकांना फायदा
राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गाजला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. ऑनलाईन बदल्यामुंळे अपंग, गंभीर आजार असलेले, पती – पत्नी एकत्रिकरण यासाठी फायदा होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.