Home » माझी वडवणी »  राष्ट्रीय लोकअदालतीत 14 प्रकरणे निकाली .

 राष्ट्रीय लोकअदालतीत 14 प्रकरणे निकाली .

 राष्ट्रीय लोकअदालतीत 14 प्रकरणे निकाली .
वडवणी/ डोंगरचा राजा आँनलाईन
वडवणी न्यायालयात काल दि.22 एप्रिल रविवार रोजी  आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत 58 प्रलंबीत दिवाणी दावे पैकी 14 दिवाणी दावे प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आले तसेच दाखलपुर्व ग्रा.प.पाणी पट्टी वसुली 121 जणांपैकी 87 जणांकडुन 43851/- रुपये रक्कम वसुल करण्यात आली आहे .
न्यायालयात वर्षानु वर्ष प्रलंबित असणारे प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटविण्यासाठी
वडवणी येथे न्यायालयात मा.न्यायाधीश के.के.चाफले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.22 एप्रिल रविवार रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय लोकअदालतीत फौजदारी , दिवाणी, एन आय अँक्ट , वैवाहिक वाद यासह दाखलपुर्व ग्रा.प.पाणी पट्टी वसुली हे प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवले होते .यामध्ये प्रलंबित 58 दिवाणी दावे प्रकरणे पैकी 14 दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आले तर दाखलपुर्व 121 ग्रा.प.पाणी पट्टी वसुली पैकी 87 जणांकडुन 43851/- रुपये पाणी पट्टी रक्कम वसुल करण्यात आली आहे .यावेळी वडवणी न्यायालयाचे न्या.मा.के.के.चाफले साहेब  ,पँनल प्रमुख अँड .डि.जे.चव्हाण ,अँड .एस.पी.डोंबाळे यांनी काम पाहिले .या वेळी वडवणी वकिल संघाचे सर्व वकिल बांधव , पक्षकार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.