Home » माझा बीड जिल्हा » प्रशासनाचे श्रमदान अर्ध्या तासात एलबीएस.बांधले.

प्रशासनाचे श्रमदान अर्ध्या तासात एलबीएस.बांधले.

प्रशासनाचे श्रमदान अर्ध्या तासात एलबीएस.बांधले.
संतोष स्वामी / दिंद्रुड
धारुर तालुक्यात वाॅटर कप स्पर्धेचे तुफान आले असुन चाळीस गावांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले गाव सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार केला आहे.धारुर तालुक्यातील प्रशाशकीय अधिकारी या स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांना प्रोत्साहन देत  आहेत.
    21 ते 27 तारखे दरम्यान वाॅटर कप स्पर्धेत सहभागी गावांना भेटी देत प्रोत्साहन देवुन प्रशासकीय स्तरावरील अडचणी दुर करण्यासाठी धारुर तहसील चे तहसीलदार राजेभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टिम सज्ज झाली आहे.दि 23 रोजी धारुर तालुक्यात चांगले काम करत वाॅटर कप स्पर्धेत पारितोषिक मिळवणारच या ध्यासाने श्रमदान करणार्या व्हरकटवाडी या गावला टीमने भेट देत श्रमदान केले.अवघ्या अर्ध्या तासात एक एल. बी. एस. बांधत गावकर्यांना मार्गदर्शन केले.व्हरकटवाडीच्या स्पर्धेतील कामाची पहाणी करत गावकर्यांची तहसिलदार राजेभाऊ कदम सह सर्वांनी प्रशंसा केली.स्पर्धेपुर्वीची 28 गुणांची परिपुर्ण झालेली कामे,शेततळे,गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार,जलयुक्त शिवार आदींची पहाणी करत उर्वरित काळात करावयाच्या कामाच्या सुचना दिल्या.गावात दुष्काळाचा डाग पुसुन गाव पाणीदार करत सुजलाम सुफलाम  करण्याच्या ध्येया ला व त्या अनुषंगाने चालु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.  तहसीलदार राजेभाऊ कदम, नायब तहसिलदार आर. व्ही. स्वामी, तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, पत्रकार अनिल महाजन,बंडू खांडेकर ,  धारुर युथ क्लबचे विजय शिनगारे, सुर्यकांत जगताप, दिनेश कापसे आदिनी व्हरकटवाडी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.