Home » माझी वडवणी » बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा.

बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा.

बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा.

बुद्धमूर्तीची रथामधुन मिरवणुक.

माजलगाव / रविकांत उघडे
शहरातील फुले नगर येथील यशोधरा बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा आज दि.२२ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला.
सदरिल कार्यक्रम हा तीन सत्रात आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सत्रात सकाळी ९:३०वा. ध्वजारोहण :पु, भन्ते संघ हस्ते झाले . त्यानंतर बुद्धमूर्तीची भव्य मिरवणुक शहरातुन काढण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात सकाळी ११:३० वा. बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा आ.अार.टि.देशमुख यांचे हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे होते तर.प्रमुख उपस्थिती माजीमंत्री प्रकाश सोळंके व नगराध्यक्ष सहाल चाऊस तर स्वागताध्यक्ष प्रा. आर.एम.कांबळे हे होते.

तिसऱ्या सत्रात धम्मदेसना दुपारी १२.३० वा. पूजनीय भन्ते महाथेरो शरणानंद(पाथरी), पूजनीय भन्ते शिलरत्न, नांदेड, पूजनीय भन्ते बुद्धशरण बोधी, औरंगाबाद यांनी केली.

या कार्यक्रमामध्ये या बुध्दविहारास बुद्धमूर्ती दान करणारे लक्ष्मण सहजराव यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला तर या बुद्धविहारास विशेष दान करणारे भास्कर घाडगे यांनी १लाख ११हजार एकशे ११ रु.,सुदाम पौळ यांनी ७६ हजार रु.,यु.एस.पायाळ यांनी ६४ हजार रु., कमलताई डोंगरे यांनी ६४ हजार रु.,प्रा.आर. एम.कांबळे यांनी ६२हजार पाचशे रु.,तर अॅड. सुनिल सौंदरमल यांनी ५० हजार रु. यांचा सत्कार करण्यात आला. तर या कार्यक्रमास

विशेष उपस्तिथी मध्ये दयानंद स्वामी,श्रीहरी मोरे,विजय साळवे, मिलिंद आव्हाड, सुहास बोराडे(पत्रकार),कचरू खळगे, डॉ.श्रीराम खळगे, अंकुश जाधव, अनिल डोंगरे, धम्मानंद साळवे, अविनाश जावळे, डॉ.कमलाकर कांबळे, मुरली साळवे, गौतम वैराळे, नवनाथ धाईजे, राजेश साळवे, रमेश ढगे, अविनाश बनसोडे,विवेक पोटभरे,सुशांत पौळ, राज सय्यदअहमद नूर, तुकाराम येवले, भीमराव टाकणखार, डॉ.अशोक तिडके, डॉ.दिगंबर बोबडे,श्रीराम मोरे, के.व्ही.साळवे, बी. वाय.उघडे, डॉ.भागवत साळवे, एन. जी. शिनगारे, यांची विशेष उपस्तिथी होती.तर ह्या बुद्ध विहार वास्तूला उभा करण्या करिता अनेक दानसुर व्यक्तीने आपल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे आर्थिक सहकार्य केलेले आहे. या कार्यक्रमास शहरातील सर्व नगरातिल मोठ्याप्रमाणात सर्व महिला पुरुष बांधवांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करुन आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.