नाणार राहणार, प्रकल्प गेला; उद्धव ठाकरे
डोंगरचा राजा । आँनलाईन
नाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची राख केल्याशिवाय राहणारा नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावलं. माझ्या कोकणाला, इथल्या कोकणी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला उद्ध्वस्त करू, अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नाणार प्रकल्पग्रस्तांना भेटून त्यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यातसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणारमध्ये दाखल झाले. त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी भर उन्हातही खचाखच भरलेल्या एका सभेला संबोधित केलं. यासभेत त्यांनी शिवसेनाविरोधकांना, शिवसेनेविरोधात खोटा प्रचार करणाऱ्यांना तर ठणकावलंच, पण नाणार प्रकल्पाची बाजू घेणाऱ्यांना जाहीर आव्हान देखील दिलं.
नाणार प्रकल्प शिवसेनेनं आणला असा खोटा प्रचार करत शिवसेनेला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. मात्र ते यशस्वी ठरणार नाही. कारण आधीच जाहीर केलं होतं की जनते सोबत आहे आणि आताही स्पष्ट सांगतो की नाणार राहणार प्रकल्प गेला, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका खणखणीत शब्दात मांडली.
तसंच हा प्रकल्प आणण्यासाठी सरकारचा आटापीटा का सुरू आहे याचं कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, इथल्या जमीनी गुजराती जैन-शहा यांनी अगदी कवडीमोल भावात खरेदी केल्या आहेत. त्यांना चांगला मोबदला मिळावा म्हणून हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्यात येत आहे. तसंच हा प्रकल्प गुजरातला नेण्याची भीती दाखवली जात आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला घेऊन जायचा असेल तर खुशाल घेऊन जा, तिथे जैन-शहा यांना मांडीवर घेऊन कुरवाळत बसा. मात्र माझ्या कोकणी माणसाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
या सभेतील महत्वाचे मुद्दे:
-नाणार राहणार की जाणार नाही, नाणार राहणार प्रकल्प गेला
-सत्तेत राहिलो म्हणून आमची मांजर झाली नाही, आम्ही वाघच आहोत
-काही लोक प्रकल्पाला विरोध करतात, तसं असेल तर सोबत या, पण प्रश्न शिवसेनेला विचारतात, सरकारला विचारा की
-आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही
-जमिनी विकण्यासाठी आलेल्या दलालांना गावबंदी करा
-उपऱ्यांसाठी मी प्रकल्प आणेन असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही
-कोकण उद्ध्वस्त करणार असाल तर तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही
-आतापर्यंत आम्ही कायद्यानेच लढत आलो आहोत, पण तुम्ही ऐकणार नसाल तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ
-मी तुमच्या सोबत आहे, पण एक वचन हवं की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आहात
-कोकणची राख करणाऱ्यांची शिवसेना राख करेल
-कोकणवासीयांची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल तर तसे होऊ देणार नाही
-इथे प्रकल्प उभा राहिला तर कोकणी माणसाला नोकरी देणार का?
-मी आव्हान देतो की जे या प्रकल्पाची तळी उचलता त्यांनी इथे छोटी सभा तरी घेऊन दाखवावी
-कोकणात एक असं गाव आहे की ज्या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती सैनिक आहे, तेव्हा मोदी-शहांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये.
-आपण देशभक्त आहात तेव्हा हे सर्व प्रकल्प घेऊन जा, आम्ही तुमची आरती करू
-जैन-शहांना मांडीवर बसवा आणि कुरवाळत बसा, पण इथे प्रकल्प होऊ देणार नाही
पण शेतकऱ्यांच्या विरोधात जात असालं, तर ते शिवसेना होऊ देणार नाही
-राज्याच्या हिताची प्रकल्पात, निर्णयात शिवसेना तंगडं घालत नाही
-केवळ गुजरातींनी इथल्या जागा घेतल्या, त्यांना चांगला मोबदला मिळावा म्हणून इथे प्रकल्प आणण्याचा डाव
-माझ्या कोकणी-मराठी माणसाच्या डोक्यावर गुजराती नाचू देणार नाही
-माझ्या कोकणाचा गुजरात मी होऊ देणार नाही
-कोकणात नको तर विदर्भात द्या, अशी भीती भाजप आमदार दाखवतो
-हा प्रकल्प गुजरातला जाईल ही भीती दाखवतात, घेऊन जा
-शिवबाचा मावळा तुम्ही विकत घेऊ शकत नाही
-पैशाची मस्ती तुम्ही तुमच्याकडे करा, इथे ती मस्ती चालणार नाही
-जागा विकत घ्यायच्या, काय किमतीने तुम्ही जागा विकल्या?
-हा प्रकल्प येण्याआधी जमीनी कशा बळकावल्या
-हे शिवसेनेचं पाप आहे, असं म्हणणाऱ्यांच्या तोडांत प्रधानांनी बोळा टाकला
-नाणार प्रकल्प आता गेला हे स्पष्ट आहे
-नाणार घेऊ देणार नाही
भूसंपादन होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे