Home » माझा बीड जिल्हा » बीड जिल्हा देशात अव्वल मोदींनी केला गौरव.

बीड जिल्हा देशात अव्वल मोदींनी केला गौरव.

बीड जिल्हा देशात अव्वल मोदींनी केला गौरव.

डोंगरचा राजा | Updated
बीड : देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिक विमा ही महत्वदायी योजना आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात प्रशासनाने केलेले कामकाजाामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे परीश्रम कामी आले असल्याचे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने देशात बीड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे. गत दोन वर्षात देशात सर्वाधिक पिक विमा बीड जिल्ह्यातून भरला गेला होता. शिवाय त्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला असल्याने यासाठी प्रशासकीय यंत्रनेने केलेल प्रयत्न लक्षात घेता हा उत्कृष्ट लोकशासन हा पुरस्कार जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हा अधिकारी एम.डी. सिंह यांनी स्वीकारला आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक एम. एल. चपळे यांचीही उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनामध्ये योगदान दिलेल्या जिल्ह्यांचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पंतप्रधान पिक विमा योजने करीता देशातून नांदेड, बीड आणि तमिळनाडू येथील शिवगंगा हे जिल्हे स्पर्धेत होते. मात्र, यामध्ये बीड जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. ही बाब प्रत्येक जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

या पुरस्कारामुळे काम करण्यास अधिक प्रेरणा मिळणार आहे. यामुळे माझ्यासह बीड जिल्ह्याचा सन्मान झाला आहे. या कार्यात पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार, आमदार, निवासी उपजिल्ह्याधिकारी , उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी, बँकेचे अधिकारी, तहसीलदार, विमा प्रतिनिधी यांच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे मी मानतो
एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी, बीड

Leave a Reply

Your email address will not be published.