Home » क्राईम स्टोरी » शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच.

शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच.

शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच.

डोंगरचा राजा/आँनलाईन

शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच, अहमदनगरनंतर आता भिवंडीत शिवसैनिकाची निर्घृण हत्याभिवंडीत एका शिवसैनिकाची हत्या करण्यात आली आहे. अहमनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच ही हत्या झाली आहे. शैलेश निमसे असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून, पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, निमसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर ओळख लपवण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता. शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख होते. पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला असून, यामागे कोणतं राजकीय कारण आहे की वैयक्तिक याची चाचपणी केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published.