Home » महाराष्ट्र माझा »  युवकांनो, समाज कार्यासाठी पुढे या – अँड.देशमुख

 युवकांनो, समाज कार्यासाठी पुढे या – अँड.देशमुख

 युवकांनो, समाज कार्यासाठी पुढे या – अँड.देशमुख
 जातेगाव / डोंगरचा राजा आँनलाईन 
समाजात आज मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. गोरगरीब जनता आणि सामान्य शेतकरी अंधःकारमय जिवन जगत आहे. त्यातच समाज त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने त्यांना कोणी वाली राहिला नाही. म्हणून युवकांनी आता समाज कार्यात मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे, असे मत जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
               अँड. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जातेगाव येथील युवकांनी बाजार तळावरआणि गावाबाहेर  फिरणाऱ्या जनावरांसाठी सहा पाणवठे ठेवून त्यात जनावरांना पाणी पिण्याची व्यवस्था आज पासून चालू केली तसेच गावात बाजार तळावर एक पाणपोही चालू केली. याच कार्यक्रमात देशातील महान व्यक्तीचे चरित्र तरुणांना समजावे म्हणून महा पुरुषांवर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच देशमुख यांनी जनतेच्या काही तक्रारी देखील स्वीकारल्या.
            या प्रसंगी बोलताना अँड. देशमुख म्हणाले की, समाजात आज सामान्य जनतेच्या फार लहान लहान अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडा अभ्यास केला तर या अडचणी गाव पातळीवर सुटू शकतात. त्यासाठी तरुणांनी त्या अडचणी जाणून घेऊन सोडविल्या पाहिजेत. जातेगाव येथील तरुण नेहमीच चांगल्या कामासाठी एकत्र येतात. ते हे काम करू शकतात. वाचन संस्कृती बलाढ्य झाली पाहिजे. वाचनातून समस्या समजतात आणि त्या सोडविण्याची ताकद देखील प्राप्त होते. एकंदरीत युवकांचा सहभाग हा राष्ट्रहितासाठी अति महत्वाचा असून युवकांनी भ्रष्ट लोकांच्या नांग्या दाबण्यासाठी एकत्र यायला हवे. युवक जर एकत्र आले आणि त्यांनी समाजाचे प्रश्न उपस्थित केले तर भले भले थंड होतील. विकासाचे प्रश्न युवकांच्या धास्तीने सुटतील. असे सांगून या तरुणांना आपण कायम मार्गदर्शन करू, असेही देशमुख म्हणाले.
            येथील विशाल पांढरे, भागवत ढोरमारे आणि अन्य  तरुणांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. विशाल पांढरे यांनी या वेळी म्हंटले की, अँड. अजित देशमुख यांनी समाजासाठी फार मोठे काम केले आहे. मोठमोठे घोटाळ्याचे प्रकरण हाताळून तडीस नेले आहेत. त्यांचा विकास कामासाठी नेहमी आग्रह असतो. तरुणांना अव्याहत पणे ते मार्गदर्शक करीत असतात. म्हणून त्यांच्याच वाढदिवसा निमित्त हा उपक्रम राबविण्याचा आम्ही तरुणांनी निर्णय घेतला. आज पाण्याची ही सोय गरजेची होती. ती आम्ही पूर्ण करीत आहोत. देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत कार्यरत राहून समाजातील दिन दुबळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असेही विशाल पांढरे म्हणाले.
           भागवत ढोरमारे म्हणाले की, असे प्रश्न सोडविण्या बरोबरच त्यांचा अभ्यास महत्वाचा आहे. वाचन वाढले तर प्रश्न का उद्भवतात आणि ते कसे सोडवावेत हे समजेल. म्हणून महान व्यक्तींचे चरित्र वाचले पाहिजे. म्हणून आम्ही वाढदिवसाचे निमित्त करून पुस्तके वाटण्याचा निर्णय घेऊन ती वाटली.
           जातेगावातील तरुणांसह आजूबाजूच्या गावचे काही लोक या कार्यक्रमाला हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.