Home » देश-विदेश » यशवंत सिन्हांचा भाजपला “जय श्रीराम”

यशवंत सिन्हांचा भाजपला “जय श्रीराम”

यशवंत सिन्हांचा भाजपला “जय श्रीराम”

डोंगरचा राजा ऑनलाईन । पाटणा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या एकूण कारभारावर नाराज होते. पाटण्यातील जाहीर कार्यक्रमात त्यांनी पक्षाला अखेरचा ‘जय श्रीराम’ केला.भाजपमधून बाहेर पडताना यशवंत सिन्हा म्हणाले की, ‘मी भाजपसोबतचे सर्व संबंध समाप्त करत आहे. आजपासून मी राजकारणातून संन्यास घेत आहे.’ भाजपमधून जाता जाता सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. भाजपमुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा गंभीर आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. ‘आज जे होत आहे त्याविरोधात आपण उभे राहिलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही’, असं सिन्हा म्हणाले. तसेच आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.यशवंत सिन्हा यावर्षी ३० जानेवारील ‘राष्ट्र सेवा मंच’ नावाच्या संघटनेची स्थापना केली होती. ‘राष्ट्र मंच’ संघटना बिगर राजकीय संघटना असणार असल्याचे त्यांनी तेव्हाच स्पष्ट केले होते. यशवंत सिन्हा १९९८ साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ तसेच परराष्ट्र या महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद भूषवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.