Home » माझी वडवणी » माजी मंत्री सोळंके यांचे प्रयत्न पाणी सुटले.

माजी मंत्री सोळंके यांचे प्रयत्न पाणी सुटले.

माजी मंत्री सोळंके यांचे प्रयत्न पाणी सुटले.
वड़वणी / डोंगरचा राजा आँनलाईन
वड़वणी तालुक्यातील उपळी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असतानाही कुंडलिका नदिपात्र कोरड़े पडली . परिणामी नदीकाठचे गावातील विहीरीनी तळ गाठला.विधंन विहीरी कोरड़्या पड़ल्या . जनावरांचा व ग्रामस्थाचा पाणी प्रश्न निर्माण झाला. नदी पात्रता पाणी सोड़ावे या करिता माजीमंत्री प्रकाशदादा सोळंके व जिल्हा परिषद सदस्य जयसिहं भैय्या सोळंके ग्रामस्थांच्या मदतिला धावुन आले. ग्राउंड लेवल पासुन प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नदिकाठच्या सर्व ग्रामपंचायत चे ठराव घेउन. विविध कार्यालयाचे उबंरठे झिझवले. व गत एक महिन्या पासुनच्या प्रयत्नाला यश आले असुन. शासन व प्रशासनाची इच्छा नसतानाही प्रकाशदादाच्या रेट्या मुळे उपळी धरणाचे पाणी कुड़ंलिका नदी पात्रता सोड़ावे लागले .विशेष म्हणजे गत पंधरा वर्षा पासुन दादांच्या प्रयत्नातुन नदिपात्रात पाणी सोड़ले जात आहे. उपळी धरणाचे पाणी कुड़ंलिका नदी पात्रता सुटल्याने उपळी. कुप्पा. दूकड़ेगाव. सुलतानपुर. केड़ेपिंप्री. धानोरा परड़ी-माटेगाव. राजेवाड़ी इत्यादी गावचा पाणी प्रश्न सुटनार आहे. उपळी धरणाचे पाणी कुड़ंलिका नदी पात्रता सुटल्याबद्धल माजीमंत्री प्रकाशदादा सोळंके यांचे राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष बजरंग साबळे. जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत. कुप्पाचे सरपंच सुभाषराव सावंत सह विविध गावचे सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. सह ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published.