माजलगाव धरणातू नदी पात्रात पाणी सोडा – गोपाळ
माजलगाव / रविकांत उघडे
माजलगाव धरणातून सिंधफना च्या पात्रात पाणी सोडा या मागणीचे निवेदन मोहनदादा मित्र मंडळाचे तालुका संघटक विनोद गोपाळ यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे
निवेदनात विनोद गोपाळ यांनी म्हटले आहे की माजलगाव तालुक्यातील धरणात सद्या पाणी साठा चांगला आहे असे असूनही सिंदफना नदीपाञात सध्या उन्हाळ्यामुळे पाणी नसल्या मुळे टंचाईचा सामना करावा लागत आहे खालच्या भागाची पाण्याची पातळी खालावली आहे. नदीपाञाच्या कडेला असलेले मनुर , लुखेगाव , चिंचोली , गोविंदपुर , देपेगाव , रोषणपुरी व या नदी पात्राच्या ठिकायावरील गावातील लोकांना पिण्याचे पाणी तसेच या गावातील पशु पक्षी यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता नदीपात्रात पाणी सोडणे अत्यंत महत्वाचे आहे.
पाणी न सोडल्यास पशु पक्षी , जनावरे , माणसे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी तातडीने नदीपात्रात पाणी सोडावे जेणे करून मानस व प्राण्यांची भटकंती होणार नाही निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन हि पाणी न सोडल्यास आठ दिवसात मोहनदादा जगताप मिञ मंडळाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने सिंदफना नदीच्या पुलावर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाचे नोंद द्यावी या मागणीचे निवेदन काल दि २१ रोजी येथील उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले या वेळी मंडळाचे शहराध्यक्ष फेरोज इनामदार ,खदिर भाई , संदीप चाळक, लहू घोलप व लक्षीमन डुकरे आदी उपस्थित होते