Home » माझी वडवणी » चंद्रभागा अर्बन शाखेचे थाटात उद्घाटन.

चंद्रभागा अर्बन शाखेचे थाटात उद्घाटन.

चंद्रभागा अर्बन शाखेचे थाटामाटात उद्घाटन.
डोंगरचा राजा / आँनलाईन
*खा.प्रितमताईंची प्रमुख उपस्थिती*
माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथिल मुख्य शाखा चंद्रभागा अर्बन चा वडवणी येथे शाखा स्थापनेचा सोहळा दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उदघाटक बीड जिल्हा खासदार प्रितमताई मुंडे तर अध्यक्षस्थानी माजलगांव विधान सभेचे आमदार आर.टी.देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमास माजी आमदार केशवराव आंधळे,राजेभाऊ मुंडे, सभापती दिनकर आंधळे , रा.काँग्रेसचे नेते भारत जगताप,भाजप तालुकाध्यक्ष रामेश्वर सावंत,रा.काँ.तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, संजय आंधळे , मच्छिंंद्र झाटे, आत्माराम जमाले , मयुर बडे, शिवाजी तौर , श्रीमंत मुंडे , ईश्वर तांबडे, महादेव रेडे, सा.डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रभागा अर्बनचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.जोडोनिया धन उत्तम व्यव्हारे,उदास विचारे वेंच करी असे चांगल्या मार्गाने पैसा कमवुन सढळ हाताने इतरांना मदत करावी या उक्ती प्रमाणे चंद्रभागा मल्टीस्टेट कार्य करत आहे.गेल्या पाच वर्षात चार शाखा स्थापन करत छोटे व्यापारी,
शेतकरी वर्गाला सदन करण्यासाठी मल्टीस्टेटचे काम चालु असल्याचे चंद्रभागा अर्बनचे अध्यक्ष अतुल ठोंबरे यांनी प्रस्ताविकात सांगितले.आमदार आर.टी. देशमुख,खासदार प्रितम ताई मुंडे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.आभार अर्बनचे संचालक बळीराम डापकर व सुत्रसंचलन गणेश गटकळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.