दोन दिवसात वाणचे पाणी सोडा – फुलचंद कराड
परळी/ डोंगरचा राजा आँनलाईन
नागापूर_वाण धरणाखालील नदीपात्राच्या बाजूने असलेल्या #गावांना सध्या भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून नागरिकांसह #जनावरांच्या #पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसात वाण प्रकल्पातील पाणी #नदीपात्रात सोडावे अन्यथा आम्ही स्वत:च कार्यकर्त्यांसह प्रकल्पाचे दार उघडूत असा इशारा भगवान सेनेचे #सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.
आज बुधवार दि.19 एप्रिल रोजी फुलचंद कराड यांनी एका शिष्टमंडळासह #तहसीलदार परळी यांना वाण धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत निवेदन दिले. वाण प्रकल्पाच्या पाण्यावर नागापुर, शिवाजीनगर तांडा, लिंबुटा,पांगरी,पांगरी तांडा, देशमुखटाकळी,सफदराबाद, नाथ्रा यासह 20 गावे अवलंबून आहेत. या भागातील विहीरी कोरड्या पडल्या असून नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. एकुण परिस्थिती आज फुलचंद कराड यांनी #तहसीलदार_शरद_झाडके यांना सांगितली असून आपण आपली मागणी #शासनाकडे कळवूत व पाणी सोडण्याबाबत शिफारस करूत असे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी फुलचंद कराड यांच्यासह कॉंगे्रसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, मंचकराव मुंडे, देविदासराव कराड, विश्वनाथ मुंडे, महादेव कराड, इंद्रमोहन मुंडे, लहुदास मुंडे,प्रशांत कराड, रवि कराड, भरत मुंडे, ज्ञानोबा फड, बाबुराव कराड, गोविंद मुंडे, नारायण दिवटे, अशोक बनसोडे, सुचित बनसोडे, नितीन कराड, दिपक मुंडे, राजेभाऊ मुंडे, विश्वंभर दोडके, परमेश्वर ढेकळे, वाल्मीक मुंडे, पांडुरंग मुंडे बळीराम मुंडे, चंद्रकांत मुंडे आदी उपस्थित होते.