Home » माझा बीड जिल्हा »  दिशा दाखवणारा समाज दिशाहीन का?- रामदासी

 दिशा दाखवणारा समाज दिशाहीन का?- रामदासी

 दिशा दाखवणारा समाज दिशाहीन का?- रामदासी
गेवराई/ डोंगरचा राजा आँनलाईन 
*ब्राह्मण ही जात नसुन तो एक विचार आहे.* *तो विचार आहे;शौर्याचा ,धैर्याचा ,औदार्याचा,ज्ञानाचा,विज्ञानाचा.
ज्ञान,ध्यान,आणि समाधान ज्यांच्या वृत्तीत असते त्याचे नाव ब्राह्मण.* *या समाज्याचा इतिहास डोळे दिपवणारा आहे.पण आज या समाज्याची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगा सारखी का झाली. संपूर्ण समाजाला दिशा दाखवणारा ब्राह्मण समाज दिशाहीन का* *झाला…?याचे आत्मचिंतन करावे लागेल. मला वाटते आत्म केंद्रीत वृत्तीमुळे तर ही वेळ आली नसेल ना..?*
*आज प्रत्येक जण आपल्याच कुटुंबात व्यग्र आहे.मजबुत असे संघटण नाही.मीच मोठा ही अहंमन्यता,अलिप्तवादी वृत्ती ,आशि अनेक कारणे या मागे आहेत.समाजाला गंभीर पणे आत्म चिंतन कराव लागेल.*
*असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार हभप.भरतबुवा रामदासी यांनी परशुराम जयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात व्यक्त केले.गेवराई येथे परशुराम जयंती निमित्त गणेश नगर येथील दत्त मंदिरात* *परशुराम संघातर्फे त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.*
*पुढे बोलतांना हभप.भरतबुवा म्हणाले की;बळावलेल्या आक्रमक जातीय वादाने या* *समाजाला त्रस्त केलेअसून कुठलेही राजकिय बळ या समाजाला उरले नाही.* *त्यामुळे हा समाज अस्थिर झाला.जो तो उठतो तो दहा बारा पोर हाताशि धरून संघटना स्थापन* *करतो.यातून प्रगल्भ नेतृत्व निर्माण होत नाही.*
 *म्हणूनच आज ही अवस्था समाजाची झाली आहे.* *वर्तमान काळात जे पद लोक संख्येच्या जोरावर मिळविता येते तेच पद बुद्धीच्या आणि समाज सेवेच्या जोरावर मिळवा.* *समन्वयाची दृष्टी ठेवा.समग्रतेचे भान ठेवा. आपल्या पावलांनी तयार होणारी पाउल वाट ही लोक जीवनात नव्या विकासाची पहाट घेउन येईल.* *यावर विश्वास ठेवा.धर्माचे आचरण करा.* *असा उपदेश हभप.भरतबुवा रामदासी यांनी केला.* *व्यासपीठावर गजानन जोशी,शिवाजी ढाकणे,गजानन कुलकर्णी,भगवान जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.*
*कार्यक्रमासाठी दत्त मंदिरात श्रोत्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री उदय पाठक यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published.