Home » माझी वडवणी » जमिनीवर खांबे काढण्यासाठी उपोषण

जमिनीवर खांबे काढण्यासाठी उपोषण

 न्यायप्रविष्ट जमिनीवर खांबे काढण्यासाठी उपोषण
वडवणी / डोंगरचा राजा आँनलाईन 
राजा हरिश्चंद्र पिंपरी येथिल शेतकरयांच्या मालकीची जमिन शासनाने संपादित केली की नाही याचा वाद न्यायालयासमोर चालु असताना गावातील काही लोकांनी जमिनीवर खांबे रोवले आहेत. हे खांबे त्वरीत काढण्यात यावेत या मागणीसाठी शेतकरयांनी गुरुवारी वडवणी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
           वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथिल गट नंबर 433 ही जमीन गावातील शिंदे परिवारातील  शेतकरयांच्या मालकीची आहे. सदर जमिन शासनाने संपादित केली की नाही याचा वाद माजलगाव न्यायालयासमोर चालु आहे. माञ गावातील काही लोक या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने जमिनीवर खांबे रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या आठवड्यात गावातील दोन लोकांनी या शेत जमिनीवर खांबे रोवले आहेत. सदर जमिनीवर खांबे रोवण्याचा कोणताही अधिकार नसताना दादागीरी करुन खांबे रोवले जात असल्याने शेतकरयांनी वडवणी तहसीलदार खिल्लारे यांना लेखी निवेदन देऊन खांबे काढुन टाकण्याची मागणी केली होती. माञ खिल्लारे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गुरुवारी राजा हरिश्चंद्र पिंपरी येथिल शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले. सायंकाळी पंचायत समितीचे सभापती पती गणेश शिंदे, पञकार अशोक निपटे यांच्यासह तहसीलदार खिल्लारे यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा केली. 24 एप्रिल रोजी राजा हरिश्चंद्र पिंपरी येथिल गट नंबर 433 मध्ये पहाणी करुन खाजगी व्यक्तीने खांबे रोवले असतील तर काढण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
अन्यथा तीव्र आंदोलन
राजा हरिश्चंद्र पिंपरी येथिल गट नंबर 433 मध्ये शासन आणि आमचा वाद चालु आहे. माञ गावातील खाजगी लोकांचा कोणताही संबंध नसताना जाणीवपूर्वक ते या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वडवणी तहसीलदार यांनी या बाबत योग्य कार्यवाही केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी प्रभाकर शिंदे यांनी दिला.
फोटो ओळी
वडवणी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण कर्त्यां शेतकरयांशी चर्चा करताना तहसीलदार खिल्लारे, गणेश शिंदे, तलाठी थोरात

Leave a Reply

Your email address will not be published.