Home » क्राईम स्टोरी » आसिफासाठी दिंन्र्दुडमध्येही मुकमोर्चा

आसिफासाठी दिंन्र्दुडमध्येही मुकमोर्चा

आसिफासाठी दिंन्र्दुडमध्येही मुकमोर्चा
दिंद्रुड / डोंगरचा राजा आँनलाईन
 मानवतेला काळीमा फासणारी अत्यंत क्रूर घटना कटुआ येथे घडली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसांठी आज (दी.१७) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात गावातील तरुण, वयोवृद्ध, विद्यार्थीनी, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असिफाला न्याय द्या, बलात्कार्यांना फाशी द्या यासह इतर घोषणांचे फलक मोर्चेकर्‍यांच्या हातात दिसून येत होते. असिफाला न्याय देण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आजच्या मुकमोर्चात मोर्चेकर्यांनी केली. उत्तर प्रदेश येथील उन्नाव व जम्मु-काश्मिरमधील कटुआ येथे दोन दुर्दैवी घटना घडल्या. यातील कटुआ येथील घटना संतापजनक असून या घटनेने अवघ्या देशात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी मोर्चे आंदोलने होत असून आज (दि.१७) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.असिफा नावाच्या चिमुरडीवर काही नराधमांनी पवित्र स्थानी बलात्कार करून तिचा खून केला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असुन दिंद्रुडकरांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला व गुन्हेगारांना फाशीची मागणी केली. सदरील हा मोर्चा दि.१७ मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता गावातुन आलावा भागातून निघाला होता, बाजार मार्गे संभाजी चौक ते पोलिस स्टेशनवर मोर्चा धडकला. लहान मुलींनी पोलिस निरीक्षक सय्यद असिफ यांना निवेदन सादर केले. मोर्चेकर्‍यांच्या हातामध्ये संतप्त भावना व्यक्त करणारे फलक दिसून येत होते. या मोर्चात भारिपचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, रिपाइंचे बाबा देशमाने, रा.काॅ.अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष सय्यद अकिल, मौलाना पठाण फारुख,प्रतिष्ठीत व्यापारी राहुल ठोंबरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, जेष्ट पत्रकार बंडुजी खांडेकर, नागेश वक्रे आदि उपस्थित होते. खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा या नराधमांचे हात,पाय, जीभ कापून काढण्याचे आदेश दिले असते अशी चर्चा गावात ऐकायला मिळत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.