Home » राजकारण » मोहनराव जगतापांनीही केले श्रमदान

मोहनराव जगतापांनीही केले श्रमदान

 मोहनराव जगतापांनीही केले श्रमदान
रविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाई
बीड जिल्ह्यातील सर्वात भीषण पाणी टंचाई धारूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना आहे.पानी फाउंडेशन च्या संकल्पेनेतून धारूर तालुक्यातील १९ गावांणी सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.
  आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मोहनराव जगताप यांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून मतदारसंघात जनतेच्या आड़ी अडचणी  सोडवित जनतेच्या सुख-दुःखात सामिल होऊन मतदार संघामध्ये संपर्क दौरे चालू केले आहेत.
     धारूर तालुक्यातील हिंगनी या गावाने वाटरकप स्पर्धेत भाग घेऊन गावातील नदी नाले यांचे खोदकाम करत तसेच झाडे लावत पाणी फाउंडेशनच्या  मार्गदर्शानाखाली गावातील सर्व जन एकत्र येत गावातील महिला,पुरुष,
लहानथोरसर्वजन कमामध्ये श्रमदान करत आहेत. हिंगनी गावातील जेष्टाणी तसेच युकांणी मोहनराव जगताप यांना आणि मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांना श्रमदान करण्यासाठी  निमंत्रित केले आणी काल रोजी गांवकार्यांचा शब्द पाळत मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याना सोबत घेऊन  मोहनराव जगताप यांनी हिंगनी येथे श्रमदान केले.यावेळी गावातील जेष्टांसह लहानांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थितती लाऊन श्रमदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published.