Home » महाराष्ट्र माझा » नायब तहसीलदारा शास्तीची नोटीस

नायब तहसीलदारा शास्तीची नोटीस

नायब तहसीलदारा शास्तीची नोटीस

– दोन हजार रु. नुकसान भरपाई देण्याचे आदेश

बीड / डोंगरचा राजा

 

माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देण्याऱ्या आष्टी येथील नायब तहसीलदार ( पुरवठा ) यांना राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद यांनी पंचवीस हजार रुपये शास्ती का लादू नये ? याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच माहिती मागणारा अर्जदार प्रदीप तुकाराम महाडीक, रा. शेरी बु. पो. कडा ता. आष्टी यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. यामुळे माहिती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यास जरब बसेल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
महाडीक यांनी रेशन दुकानासंदर्भात माहिती मागितली होती. मात्र नायब तहसीलदार यांनी ती दिलीच नाही. त्यामुळे महाडीक यांनी बीड येथील अँड. अजित एम. देशमुख यांचेमार्फत राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे धाव घेतली होती. सुनावणीत माहिती दिली नसल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे आयोगाने पंधरा दिवसात विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते.
आयोगाच्या आदेशानंतर पुन्हा माहिती अधिकारी यांनी आदेशाचा अवमान करून माहिती दिलीच नाही. त्यामुळे महाडीक यांनी पुन्हा आयोगात धाव घेतली होती. आता ही माहिती तहसीलदार, आष्टी यांनी अर्जदारास आदेश प्राप्त होताच आठ दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार यांना आता माहिती द्यावी लागणार आहे.
माहिती अधिकारी यांना आता तीस दिवसाच्या आत आयोगासमोर व्यक्तिशः हजर होऊन खुलासा सादर करावयाचा आहे. त्याच प्रमाणे महाडीक यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई धनादेशाने देण्याचे आदेश आहेत.
माहिती न देणाऱ्या माहिती अधिकाऱ्यांना अशी चपराक बसने गरजेचे आहे. माहिती अधिकार हा नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. कायद्यातील तरतुदींचा हा अवमान आहे. जो पर्यंत अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत रहाणार आहेत. माहिती न दडवता ती अधिकाऱ्यांनी देऊन प्रशासन पारदर्शी आहे, हे दाखवून दयावे, असे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.