Home » माझा बीड जिल्हा » हभप भरतबुवांनी परंपरा जोपासली – आनंद

हभप भरतबुवांनी परंपरा जोपासली – आनंद

हभप भरतबुवांनी परंपरा जोपासली – आनंद

पुणे / डोंगरचा राजा आँनलाईन

*कीर्तन ही एक आध्यात्मिक परंपरा आहे. या परंपरेला* *शास्त्राचे व संत तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. संत विचारांचा* *नंदादीप तेवत ठेवण्याचे काम महाराष्ट्रातील ख्यातनाम* *कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांनी तीन तपाहून* *अधिक काळ केले. कीर्तन महोत्सव, कीर्तन प्रशिक्षण* *शिबीर, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व दासबोध* *पारायण व विविध उपक्रमांतून त्यांनी समाज जीवनात* *सदाचाराचे संक्रमण केले. चाळीस वर्षात संपूर्ण देशभरात* *दहा हजारांचे वर कीर्तने करून समाज प्रबोधनाचे प्रभावी* *कार्य केले अशा थोर व प्रथितयश भरतबुवा रामदासी यांना* *श्री संत दासगणू महाराज पुरस्कार देतांना श्री साईचैतन्य* *परिवाराला मनस्वी आनंद होत आहे, असे विचार सुप्रसिध्द* *साहित्यिक व वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले.*
*ते पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत* *होते. पुढे बोलतांना पिंपळकर म्हणाले की,*
*ह.भ.प.भरतबुवांनी नुसते कीर्तनच केले नाही तर ते स्वतः* *कीर्तन जगले. कीर्तन हे सतीचे वाण आहे. प्रचंड अभ्यास,* *मेहनत व समाज मान्यता असावी लागते. ईश्वरी* *आधिष्ठानाशिवाय हे शक्यच नाही.*
*त्यांच्या या प्रबोधन कार्याची गिनीज बुकात नोंद व्हावी,* *अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. विश्रांतवाडी, पुणे येथील* *श्री साईचैतन्य परिवाराच्या वतीने साईबाबा मंदिरात हजारो* *श्रोत्यांच्या उपस्थितीत भरतबुवा रामदासी यांना शाल,* *श्रीफळ, पुष्पहार, मानधन व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण* *गौरव करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देतांना* *ह.भ.प.भरतबुवा म्हणाले की, खरं तर हा पुरस्कार म्हणजे* *प्रत्यक्ष साईबाबांचाच आशिर्वाद आहे. पुणेकरांनी केलेला* *हा गौरव सरस्वतीने दिलेला आशिर्वाद आहे. मी साईचैतन्य* *परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.*

Leave a Reply

Your email address will not be published.