Home » राजकारण » भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच:आंबेडकर

भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच:आंबेडकर

भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच:आंबेडकर

डोंगरचा राजा ऑनलाइन

भारिप—बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ यांच्या चौकशीतून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना छगन भुजबळ यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांना चौकशीसाठी अटक केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले नसून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी, यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र, चौकशीत छगन भुजबळ यांच्याविरोधात ठोस माहिती पुढे आलेली नाही. तरी देखील, भुजबळ यांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच आहे, असे ते म्हणालेत. कोणीही चौकशीत दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.