Home » मनोरंजन »  ‘भर दुपारी’ ला राष्ट्रीय पुरस्कार 

 ‘भर दुपारी’ ला राष्ट्रीय पुरस्कार 

 ‘भर दुपारी’ ला राष्ट्रीय पुरस्कार 
किल्लेधारुर / डोंगरचा राजा आँनलाईन 
किल्लेधारुर चे भुमिपुत्र मराठी चित्रपट व मालिकेतील अभिनेते सुहास सिरसट यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘भर दुपारी’ या लघुपटास नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने सुहास सिरसट यांचा धारुर येथे सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
            येथील मराठी चित्रपट व टि.व्ही. स्टार सुहास सिरसट यांनी प्रमुख भुमिका साकारलेल्या ‘भर दुपारी’ या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या लघुपटात सिरसट यांनी कुटूंब प्रमुख सुहास ची भुमिका साकारली. सामाजिक जनजागृती करणाऱ्या या लघुपटाचे दिग्दर्शन स्वप्निल कापुरे यांनी तर एफ.टि.आय.आय. या संस्थेने निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल सुहास सिरसट यांचा धारुरात सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देशपांडे, प्रकाश काळे, सुधीर शिनगारे, ॲड. चोले, सुरेश फावडे आदी.
तहसील कार्यालयात हि तहसीलदार राजाभाऊ कदम नायब तहसीलदार सुहास हजारे रामेश्वर स्वामी यांनी त्यांचा सत्कार केला

Leave a Reply

Your email address will not be published.