Home » ब्रेकिंग न्यूज » पुण्यात युवकांचा मोर्चा

पुण्यात युवकांचा मोर्चा

पुण्यात युवकांचा मोर्चा

 

डोंगरचा राजा/आँनलाईन

 

पुण्यातील महाविद्यालयातील तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, बालगंधर्व रंगमंदिर चौक तेथून पुढे डेक्कन चौकात समारोप

कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून पुण्यातील गुडलक चौकातून फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे डेक्कन येथे तरुणाईने मोर्चा काढला.

कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून पुण्यातील गुडलक चौकातून फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे डेक्कन येथे तरुणाईने मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्यासंख्येने तरुणाई सहभागी झाली होती.

जम्मू मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील महाविद्यालयातील तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, बालगंधर्व रंगमंदिर चौक तेथून पुढे डेक्कन चौकात या मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चात असिफाला न्याय मिळाला पाहिजे, बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कडक कायदा केला पाहिजे. यासह अनेक पोस्टर घेऊन तरुण वर्ग सहभागी झाला होता. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.