Home » माझा बीड जिल्हा » नराधमांना भर चौकात फाशी द्या – कमलताई

नराधमांना भर चौकात फाशी द्या – कमलताई

नराधमांना भर चौकात फाशी द्या – कमलताई

बीड/ डोंगरचा राजा आँनलाईन

जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील अल्पवयीन 8 वर्षीय चिमरडुचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यातील आरोपींना भर चौकात फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी जिजाऊ बिगे्रडच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कठुआ येथील आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला काही लोकांनी डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर सातत्याने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकिला काळिमा फासणारी असून या प्रकरणातील आरोपींना भरचौकात फासावर लटकविण्यात यावे, जेने करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. अशी मागणी जिजाऊ बिग्रेडच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.