Home » माझा बीड जिल्हा » खोदकामात सापडली मुर्ती; सोबत नागराजही

खोदकामात सापडली मुर्ती; सोबत नागराजही

खोदकामात सापडली मुर्ती; सोबत नागराजही

-मुर्तीची पुजा सुरु; प्राचीन खजिन्याची चर्चा.
-तहसीलदार यांनी खोदकाम थांबवले.

डोंगरचा राजा / आँनलाईन
परळी अंबाजोगाई रोड कामासाठी मुरूम खोदकाम करताना प्राचीन मूर्ती सापडली असून मूर्तीच्या आवती भोवती नागराज विराजमान झाले आहेत. जिथे नागराज आले त्या ठिकाणी प्राचीन खजाना असावा जनतेत चर्चा सूरु असून घटनास्थळी अनेक नागरीकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
परळी-अंबाजोगाई रोड कामासाठी मुरूम खोदकाम करताना प्राचीन मूर्ती सापडली! मूर्तीच्या आवती भोवती नागराज विराजमान जीथे नागराज आले त्या ठिकाणी प्राचीन खजाना असावा अशी चर्चा आहे.
शहरातील परळी अंबाजोगाई रोडचे रुंदीकरण काम चालू आहे सदरील रोड कामास मुरूम लागत असल्याने रोड बाजूस असलेल्या माळ रान कन्हेरवाडी आनंद नगर येथे खोदकाम करताना प्राचीन मूर्ती आढळली विशेष बाब म्हणजे या मूर्ती च्या ठिकाणी कवडी रंगाचे कलिंदर नागराज विराजमान असल्याने सदर बातमी परळी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी पहावयास मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान मूर्ती दिसताच नागरिकांनी खोदकाम थांबवले व लगेच बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परळी शहरात पसरल्याने नागराज चे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे या ठिकाणी नायब तहसीलदार बरदाळे अप्पा तहसीलदार शरद झाडके यांनी भेट देऊन सदर घटनेचा विडिओ पुरातत्व विभागास पाठवण्यात आले आहे खोदकाम बंद कारुण्याची सूचनाही या वेळी तहसीलदार यांनी केली आहे तरी जनतेत मोठा भक्ती सागर वाहत आल्याने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येत आहे पुष्पहार,गुलाल, वाहत त्या ठिकाणी पूजा सुरू करण्यात सुरवात झाल्याने शहरात मोठी चर्चा होत आहे ज्या ठिकाणी नागराज आलेत मूर्ती भेटली त्या ठिकाणी प्राचीन खजाना असेल असे ही भाविक शब्द नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.