Home » देश-विदेश » केंद्रीयमंत्री गडकरी,मुख्यमंत्री फडणवीस बीड जिल्हयात

केंद्रीयमंत्री गडकरी,मुख्यमंत्री फडणवीस बीड जिल्हयात

केंद्रीयमंत्री गडकरी,मुख्यमंत्री फडणवीस बीड जिल्हयात

बीड /डोंगरचा राजा आँनलाईन

-४ हजार ५८७ कोटीच्या कामाचा शुभारंभ
-कार्यक्रमाची जबाबदारी ना.पंकजा मुंडेंकडे

बीड जिल्हयातील विविध भागातून जाणाऱ्या व ४ हजार ५८७ कोटी ५४ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या ७२९ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १९ एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी पालकमंञी या नात्याने ना. पंकजाताई मुंडे यांच्यावर देण्यात आली आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि गंगा व जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून भव्य असा निधी महाराष्ट्र राज्याच्या रस्त्यांसाठी मिळाला आहे. राज्यभरात त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्यांनी आरंभला असून येत्या गुरूवारी परभणी, नांदेड व बीड जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत. बीड जिल्ह्यात ७२९ किमी लांबीच्या व ६ हजार ४२ कोटी रूपये मंजूर कामांपैकी ४ हजार ५८७ कोटी ५४ लाख रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ बीड जिल्ह्यात होत आहे.

*मुख्य सोहळा वाघाळ्यात*
——————————-
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला महामार्गाच्या माध्यमातून जोडण्याचे मोठे काम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कोनशीला अनावरण समारंभ येत्या गुरूवारी दुपारी २ वा. परळी मतदारसंघात अंबाजोगाई साखर कारखाना परिसरात म्हणजे वाघाळा ता. अंबाजोगाई येथे घेण्याचे निश्चित झाले आहे. ग्राम विकास व महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे हया बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने समारंभाच्या संयोजक असणार आहेत. बीड जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने होत असलेल्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
■■■■

Leave a Reply

Your email address will not be published.