Home » माझा बीड जिल्हा » उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-डॉ योगेश क्षीरसागर

उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-डॉ योगेश क्षीरसागर

उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-डॉ योगेश क्षीरसागर

बीड सोमनाथ सोनटक्के
जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय आसेफावर आत्याचार करून हत्या करण्यात आली होती. उन्नावमध्येही दलित मुलीवर अत्याचार झाला असून देशात अशा घटना वाढत आहेत. आरोपींना काठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी देशाभर आंदोलने होत आहेत. त्यानुसारच उद्या मंगळवारी बीड येथे सर्वधर्मीय सर्वपक्षीय असा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. लाखोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले आहे
या घटनेचा निषेध दर्शिवण्यासाठी रविवारी विश्रामगृह येथे बैठक पार पडली असून सर्वपक्षीयच नव्हे तर सर्वच नागरिकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला,
किल्ले मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय महामूकमोर्चा हा मंगळवारी सकाळी ११ वाजता किल्ला मैदान येथून कारंजा, राजूरी वेस, बशीरगंज चौक, छत्रपती शिवाजी महराज चौक व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे.* लोकशही मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवदेन देण्यात येणार आहे.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.