आरोग्य विभागाकडुन डाॅ.चौरे यांचा गौरव
माजलगाव/ रविकांत उघडे
तालुक्यातील टाकरवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ दशरथ चौरे यांचा आरोग्य क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्या बदल जिल्ह्याच्या खासदार मा. डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपञ देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य क्षेञात ऊल्लेखनीय कार्य केल्या बदल जिल्ह्यातील आधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचे आयोजन बीड येथे करण्यात आले होते. यावेळी प्राथिमिक आरोग्य क्रेंद्र टाकरवण ता. माजलगाव येथील वैद्यकीय आधिकारी डाॅ दशरथ चौरे यांचा सत्कार जिल्ह्याच्या खासदार मा. डाॅ . प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपञ देऊन करण्यात आला.यावेळी आ.विनायक मेटे , जि. प. अध्यक्षा श्रीमती सविताताई गोल्हार , आरोग्य सभापती श्री राजेसाहेब देशमुख , मुख्य कार्यकारी आधिकारी श्री अमोल येडगे , जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ . आर. बी पवार तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ अशोक थोरात ऊपस्थित होते.डाॅ दशरथ चौरे यांनी आपल्या प्रा आ केंद्राचे दैनंदिन काम पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शासकीय संस्थांमध्ये कुटुंब नियोजन टाका शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी सौ डाॅ मनिषा चौरे या देखील राञंदिवस जिल्हा रुग्णालय बीड येथे स्त्री रोग विभागात कार्यरत आहेत. असे हे डाॅक्टर दांपत्य सतत गोरगरिबांना सेवा देवून जिल्ह्यात आपले नाव करत आहे.