Home » माझी वडवणी » वंचितांना शिक्षण  प्रवाहात आनणार ः- राऊत 

वंचितांना शिक्षण  प्रवाहात आनणार ः- राऊत 

वंचितांना शिक्षण  प्रवाहात आनणार ः- राऊत 
वडवणी /डोंगरचा राजा
   येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी 10वी  वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयाचे क्लास मोफत देण्याचा उपक्रम प्राचार्य धुराजी राऊत यांनी सुरु केलाआहे.
     बुधवारी सकाळी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य धुराजी राऊत यांनी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात मोफत क्लास सुरु करण्याची घोषणा केली. गणितासाठी सुनिल कुलकर्णी, सचिन गिलबीले, तुकाराम डमरे, प्राचार्य धुराजी राऊत.
इंग्रजीसाठी बाबासाहेब चोले, श्रीमती वंदना घुले तर विज्ञानासाठी अशोक मस्के, दिनेश घोळवे हे या उन्हाळी वर्गासाठी मोफत मार्गदर्शन करणार आहेत असे यावेळी प्राचार्य धुराजी राऊत यांनी जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अशोक मस्के यांनी तर आभार हरिभाऊ निवरकर यांनी मानले. कार्यक्रमास  10 वी वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी
वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य धुराजी राऊत, अशोक मस्के व शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published.