Home » माझा बीड जिल्हा » भिमगितांच्या ललकारीत संदिपची झळाळी;

भिमगितांच्या ललकारीत संदिपची झळाळी;

भिमगितांच्या ललकारीत संदिपची झळाळी;
बीड / डोंगरचा राजा आँनलाईन
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त काल सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियोजितरित्या परवा आयोजित केलेला हा गायनाचा कार्यक्रम पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. काल झालेल्या या भीमगीतांच्या ललकारीत संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाच्या झळाळीत आदर्श शिंदेंच्या या गायनाला प्रतिसाद द्यायला तुफान जनसमुदाय लोटला होता.
  पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या या भीमगीतांच्या कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे काल दिसून आले. संदीप क्षीरसागरांच्या हाकेला जबरदस्त प्रतिसाद देत आदर्श शिंदेंच्या गाण्याला तमाम भीमसागर लोटला होता. परिपूर्ण नियोजनात तालबद्धरीत्या आदर्श शिंदे अन सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांना भिमचाहत्यांनी भरभरून प्रतिसाद अन दादही दिली. कार्यक्रमावेळी संदीप क्षीरसागरांनी श्वासात श्वास असेपर्यंत महामानवाच्या जयंतीनिमित्त असेच सामाजिक उपक्रम घेत राहील असा शब्द उपस्थितांना दिला. पुढे बोलताना ते म्हणाले कि. तुम्हा जनतेचे असेच प्रेम राहूद्या, समाजविघातक लोकांना आपण बाजूला केले पाहिजे. समाजविघातकांचे घाव मी आधी माझ्या छातीवर घेईल मात्र माझ्या जनतेला त्रास होऊ देणार नाही. फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. शिवजयंतीप्रमाणेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा फुले व डॉ आंबेडकरांसह इतर महापुरुषांच्या जयंती मी माझा श्वासात श्वास असेपर्यंत करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भीमगीतांच्या कार्यक्रमाला माजी आ. उषाताई दराडे, माजी आ. राजेंद्र जगताप, माजी आ. सय्यद सलीम, जेष्ठ नेते डीबी बागल, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, कारागृह अधीक्षक पवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे, अशोक हिंगे, प्रवीण राख, जयसिंग चुंगडे, शीतलकुमार सुकाळे, राहुल साळवे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, काकू नाना विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, कार्यक्रमास उपस्थित असलेले तमाम भीमचाहते, महिला, युवक, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
====================
कृतीतून नेतृत्वाची सिद्धता; स्वछतेसाठी संदिपभैय्यांनी स्वतः हाती घेतला झाडू….
सुनियोजित कार्यक्रमात पावसाने घातलेल्या व्यत्ययानंतर कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आला. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रमस्थळावर पाणी साचल्याने ते पाणी मैदानाबाहेर काढण्यासाठी संदीपभैय्यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छतेचे काम सुरु केले. हे बघून आयोजकांनी व तेथील उपस्थितांनीही हातात झाडू घेत अल्पावधीत मैदान स्वच्छ करून टाकले. काम कोणतेही असो आवश्यक कामात स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे हे काल भैय्यांनी आपल्या कृतीतून नेतृत्व सिद्ध केले.
==================
महात्मा फुलेजयंतीनिमित्त महिलांचा फेटे बांधून सन्मान
……….
 क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिंदेंच्या भीमगीतांच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांचा विशेष सन्मान करत  फेटे बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय संख्येने होती.
================================
उद्धारिली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ गाण्यांचा वन्समोअर
आदर्श शिंदेंच्या गाण्यांना चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद देत वन्समोअर च्या मागणीचा पाऊसच पाडला. ‘उद्धारिली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’, भीमा कोरेगाव, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान …. अशा गाण्यांनी उपस्थित भीमसागर मंत्रमुग्ध झाला होता. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सचे मैदान भरगच्च भरून इमारतीवर बसत प्रेक्षकांनी यावेळी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
====================
तुमचे असेच प्रेम राहूद्या, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी कार्य करत राहील
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना संदीप क्षीरसागरांनी ‘ तुमचे असेच प्रेम माझ्या पाठीशी राहूद्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी कार्य करत राहील. महापुरुषांच्या जयंती आयोजनातून समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत राहणार असून समाजविघातकांचे वार स्वतःच्या छातीवर घेत शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांसाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.