Home » विशेष लेख » सरपंच ते आमदार आंधळेंची फिनिक्स भरारी

सरपंच ते आमदार आंधळेंची फिनिक्स भरारी

सरपंच ते आमदार आंधळेंची फिनिक्स भरारी
डोंगरचा राजा आँनलाईन / विष्णू आंधळे 
      डोंगरपट्ट्यातील  एक गाव रूई (पिंपळा)! जिथं ना वाहतूकीची साधनं,  ना मूलभूत सुविधा.  आणि तो काळ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा 10 वर्षातला काळ.  पिंपळ्यावरून दोन भाऊ कुंडलिका नदी ओलांडून आले आणि रूई ह्या गावाची निर्मिती झाली असे आमचे पूर्वज सांगायचे. पिंपळा हे आंधळेेंनी वसवलेलं गाव.  तसे मुळ आंधळे हे नगर जिल्ह्यातून इकडे आले.  पेशव्यांचे सरदार असे शूरवीर लोक म्हणजे हे आंधळे.  त्यांच्या प्रवासावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.  ह्याच आंधळे कुळातले आजच्या लेखाचे आपले नायक मा.  केशवदादा आंधळे यांचा प्रवास म्हणजे शून्य ते विश्व निर्मितीची प्रक्रिया होय.  त्याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. वडवणीच्या कुंडलिकराव मुंडे यांची जेष्ठ मुलगी गंगाबाई व रूईच्या धोंडीबा आंधळेे यांचे चिरंजीव यादवराव आंधळेे यांच्या पोटी दि.6 एप्रिल 1953 रोजी एक पुत्ररत्न प्राप्त झाले.  सावळा वर्ण अन् नाकी डोळी राजबिंडे बालक जणू विठ्ठलाची प्रतिकृति आई बापाला वाटली.  मोठ्या उत्साहात गावाला घुग-या वाटून या तेजस्वी बालकाचे नामकरण करण्यात आले “केशव” !  केशव नंतर दिनकर,  शंकर हि मुले व काशीबाई,  जिजाबाई व कुसूम ह्या मुली ह्या दांपत्याची घरी जन्माला आली.  केशवच्या अंगी असणारे नेतृत्व गुण आई वडीलांनी लहानपणीच हेरले होते.  गरज होती ती शिक्षणाची, त्या साठी रूईमधल्या प्राथमिक शिक्षणानंतर वडवणीला आजी आजोबा कुंडलिकराव व कलावतीबाई यांच्या कडे पाठवण्यात आलं.  वडवणीत ख-या अर्थाने ह्या बालकाच्या नेतृत्व गुणांना चालना मिळाली.  सर्व नातवंडात मोठा म्हणून जास्त लाड ही झाले,  आजोबांचे नेतृत्व गुण शिकता आले.  मामा रघुनाथराव,  गणपतराव व वैजेनाथराव आप आपल्या व्यवसायात यशस्वी होते. भविष्यातला आमदार आपल्यात खेळतो – बागडतो आहे असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल.  मामेभाऊ राजाभाऊ हे दादाहून लहान पण बालसवंगडी.  दोघेही कृष्ण – बलरामासारखे एक सोबत मोठे झाले,  अन् भविष्यातही तोडीस तोड नेते झाले.  एक आमदार तर दूसरा जिल्हा बँकेचा अध्यक्ष!  संत भगवानबाबा वडवणीत आले की कुंडलिकराव मुंडे यांच्या घरी जरूर येत,  या दोघांनीही त्यांचे प्रत्यक्ष आशिर्वाद लाभले! ज्याचा फलस्वरूप दोघेही यशस्वी झाले.म्हणूनच रूई ही जशी दादांची जन्मभूमि तसी वडवणी ही कर्मभूमि आहे.  1980 च्या दशकात बीड जिल्हा हा स्व.  केशरकाकू क्षीरसागर यांच्या मागे खंबीर पणे उभे होते.  त्यावेळी डोंगरपट्टाही काकूंच्या बाजूने होता.  गोपीनाथ मुंडे नावाचा एक तरुण आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडत होता.  सुरवातीला डोंगरपट्यातून एवढा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही.  त्या काळी कै. कुंडलिकराव मुंडे यांनी त्या तरूणाला साथ देण्याचे ठरवले.  हळू हळू साहेबांचा जनाधार वाढू लागला केशवराव आंधळे व राजाभाऊ मुंडेंसारखे खंबीर तरूण साहेबांच्या मागे उभे राहिले ते आयुष्य भरासाठी!  साहेबांचे अंत्यत विश्वासू व जवळच्या माणसांपैकी एक म्हणजे केशवराव आंधळे.  रूई पिंपळा गावचे सरपंच,  त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असा मैलाचा दगड त्यांनी पार केला.  1995-1999 ह्या साहेबांच्या काळात त्यांनी असंख्य विकासकामे डोंगरपट्यात केली,  रस्त्यांचे जाळे तयार केले.  1989 ला महाराणी ताराबाई कन्या शाळेची स्थापना केली,  कारण दादांच्या म्हणण्या नुसार शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे अन् तो पिणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,  अन्याय सहन करणार नाही. लोकांचेही दादा वर तितकेच प्रेम होते कारण ज्या काळी वडवणीत एकही सामाजिक संघटना नव्हती तेव्हा वडवणीतील रवींद्र मुंडे व इतर तरूणांनी मिळून केशवदादा आंधळे मित्रमंडळाची स्थापना केली होती.  पाणपोई,  गरिबांची लग्न,  पुस्तक वाटप,  रूग्नांना मदत अशी असंख्य कार्य त्यांनी केली. 2004 च्या विधानसभा निवडणूकीने इतिहास घडवला.  जयदत्त क्षीरसागर यांच्या सारख्या खंबीर नेत्याला पराभूत करूण एका शेतक-याचा मुलगा आमदार झाला.  5 वर्षाच्या काळात असंख्य विकासकामे दादांनी केली.  डोंगरपट्याच्या विकासासाठी स्वत:च्या गावाचे विस्थापन करू शकणारा एवढा त्यागी व कर्मनिष्ठ व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. वडवणीत आजही गरिबांच्या मुलीबाळी दादांनी स्थापन केलेल्या वस्तिगृहात मोफत शिक्षण घेत आहेत.  इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखून दादांनी प्रमोद महाजन इंग्लिश स्कूल सुरू केले आहे.  कन्या शाळेचे मुले व मुलींचे 12 वी पर्यंतचे  विद्यालय झाले आहे. दादांच्या पत्नी सौ. सुलोचना आंधळे ह्यांनी बराच काळ वडवणी पंचायत समितिच्या सभापति म्हणून काम केले आहे.  मुलगा संजय आजही रूईचे सरपंच आहेत,  दूसरा मुलगा अशोक हा अभियंता आहे.  मुली शोभा,  शारदा,  संजीवनी,  स्वाती,  अंजली आप आपल्या घरी सुखी आहेत.  कुटूंब वत्सल दादा नातवंडांत रममान होताना दिसतात.  बंधु दिनकरराव आंधळे मोठा काळ वडवणीचे सरपंच होते,  सध्या कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापति आहेत.  शंकरराव मराठी चित्रपट सुष्टीतले ख्यातनाम अभिनेते आहेत. दादांचे आयुष्य हे जनकल्याणासाठी सार्थकी लागले आहेत.  दादा दरवर्षी आपले मित्र रामकृष्ण घुले यांच्या समवेत आषाढ़ी वारीला पायी जात असतात.  वडवणीच्या संत भगवानबाबा मंदिराच्या सप्ताहात ते हरिपाठात रममान होताना दिसतात. दादा आयुष्यात एकच खंत बोलून दाखवतात ते म्हणजे लोकनेते गोपीनाथराव यांचे मध्येच निघुन जाने. त्या दुखातून सावरताना दादा पंकजाताईंच्या मागे जेष्ठ वडीलधा-याप्रमाणे उभे असतात.  आपल्या दैवताच्या आठवणीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाणची त्यांनी स्थापना केली आहे.  वडवणीतील ऊस उत्पादकांसाठी गुळ उत्पादन कारखाने उभारला आहे ज्याचे निश्चितच साखर कारखान्यात रूपांतर झाल्या शिवाय राहणार नाही.  अव्याहत पण समाजकारणासाठी राबणा-या ह्या लोकनेत्यास मनापासून सलाम! मी दादांच्या चुलत बंधु लक्ष्मणराव महादेवराव आंधळे यांचा मुलगा,  नात्याने दादा माझे चुलते!  पण शाळेपासूणच गोपीनाथराव मुंडे साहेब व दादा हे दोघे माझे आदर्श राहिले आहेत. आज दादांच्याच शाळेत मी अध्यापनाचे काम करतो.  माझ्या सारख्या असंख्य तरूणांना दादांनी रोजगार दिला.  योग्य सल्ला देऊन रोजी रोटीचा मार्ग निर्माण करून दिला. आज दादांचा 65 वा वाढदिवस, दादांना वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.  आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देओ.  आपल्या हातून असेच जनकल्याण घडत राहो,  याच सदिच्छा!
आपलाच
 विष्णु लक्ष्मणराव आंधळे, वडवणी मो.+91 94054 59898  सहशिक्षक महाराणी  ताराबाई  मा.वि वडवणी

Leave a Reply

Your email address will not be published.