Home » देश-विदेश »  राहूल आवारे सुवर्णपदकाचा मानकरी

 राहूल आवारे सुवर्णपदकाचा मानकरी

 राहूल आवारे सुवर्णपदकाचा मानकरी
 डोंगरचा राजा ऑनलाईन
राष्ट्रकूल स्पर्धेच्या ५७ किलो वजन गटात राहूल आवारे याने कॅनडाचा एस. तहकाशी याचा १५- ७ असा पराभव करून सुवर्ण पदक पटकाविले आहे. दुपारी १२ च्या दरम्यान आॅस्ट्रोलिया येथे हा सामना पार पडला. तिघांना चितपट करीत राहूल आवारे यांने अंतिम फेरीत मजल मारली होती. त्याच्या विजयाने पाटोदा शहराचे नाव लागतिक पातळीवर गेले असून विजयाची वार्ता समजातच पाटोदा शहरात फटसक्यांची आतेषबाजी करीत विजय साजरा करण्यात आला आहे. या सामन्याबद्दल बुधवारपासूनच पाटोदाकरांना वेध लागले होते. विजयासाठी त्याने सराव केलेल्या तालमीमध्ये होमहवनही करण्यात आला होता. अखेर राहूलचे प्रयत्न आणि सबंध जिल्हावासियांची प्रार्थना कामी आली असून त्याने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published.