Home » देश-विदेश » पाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद

पाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद

पाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद
डोंगरचा राजा / आँनलाईन
जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडीचा जवान शहीद झाला आहे. किरण थोरात (वय २१) असे शहीद झालेल्‍या जवानाचे नाव आहे.
काल (दि.११) रोजी दुपारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीमध्ये  पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यावेळी या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना वीरमरण आलं. दरम्‍यान, सोमवारीही पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.