Home » माझा बीड जिल्हा » व्हरकटवाडीला थेट अमेरिकेतुन भेट

व्हरकटवाडीला थेट अमेरिकेतुन भेट

व्हरकटवाडीला थेट अमेरिकेतुन भेट
 -सामाजिक संस्थांचाही पुढाकार-
डोंगरचा राजा / सुर्यकांत बडे
व्हरकटवाडी येथे सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेने गावात तुफान आनले आहे.8 तारखेच्या मध्यरात्री पासुन ग्रामस्थांनी एकमताने श्रमदानास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रातुन आता डोंगरपट्ट्यात वाटर स्पर्धेसाठी सहभागी गावांना भेटी देण्याचा ओघ सुरु झाला आहे. ज्ञान प्रबोधनी महाराष्ट्र,विवेकवाडी प्रतिष्ठान,सेव्ह इंडियन फार्मर आॅफ अमेरिकेच्या पदाधिकार्यांनी व्हरकट वाडीला भेट देवुन ग्रामस्थांचे मनोबल वाढवले.स्वता: श्रमदान करत गावकर्यांना प्रोत्साहित केले. पाणी फाऊडेशन  च्या या स्पर्धेसाठी व व्हरकटवाडी गावात जलसिंचन प्रभावी राबवण्यासाठी सेव्ह इंडियन फार्मर आॅफ अमेरिका या सामाजिक संस्थेने तसेच विवेकवाडी परिवार डोंबिवली व ज्ञानप्रबोधिनी यांच्या तर्फे व्हर कटवाडी गावाला पाेकलेन १०० तास आणि जेसीबी २५० तास काम करेन इतके अर्थ सहाय्य  व्हरकटवाडी च्या शेतात बांधबंधीस्तीसाठी देण्यात आले त्यामुळे गावाला याचा भरपुर फायदा होणार असुन गावकर्याचे मनोबल वाढण्यास मदत झाल्याचे सरपंच ललिता राम व्हरकटे यांनी सांगितले आहे.
अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेत पाणी चळवळीत अशा प्रकारे या स्पर्धेत सहभागी गावांना मदत केल्यास महाराष्ट्र पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही.ग्रामस्थांचे श्रम व सामाजिक संस्थांचे आर्थिक सहाय्य महाराष्ट्रात पाणी चळवळीला तुफान आणणार हे मात्र निश्चित आहे.
     कोट
*श्रमदाना साठी हजारो हात सरसावले*
   पाणी फांऊडेशन ची वाॕटर कप स्पर्धा तालूक्यात लोकचळवळ होत असून आपले गाव दुष्काळ व टॕकर मुक्त व्हावे या साठी श्रमदाना साठी हजारो हात सरसावत आहेत मंगळवारी मी व पञकार मिञ सय्यद शाकेर पाणी  फांऊडेशन चे तालूका समन्वयक सुरेश सोंळके मुख्यमंञी ग्राम परीवर्तक जांलिदर वनवे सरपंच मंच्छीद्र तिडके आम्ही गावकरी करत असलेल्या श्रमदानाचे काम पाहीले येथे काय काम केले तर गाव दुष्काळ मुक्त होऊ शकते यांचा आराखडा ठरवला डिप सि सि टी पाझरतलाव दुरूस्ती आदी कामा बद्दल ठरवले .आसोला येथे हि काम करणाऱ्या कार्यकर्त्या बरोबर बैठक घेऊन कामा बद्दल नियोजन केले या गावक-याना प्रोत्साहन देण्याचे काम केले

Leave a Reply

Your email address will not be published.