Home » माझी वडवणी »  “रास” पुन्हा बघायला मिळाली- एस.एम.देशमुख 

 “रास” पुन्हा बघायला मिळाली- एस.एम.देशमुख 

 “रास” पुन्हा बघायला मिळाली- एस.एम.देशमुख
डोंगरचा राजा / आँनलाईन
“रास” या शब्दाचा अर्थ आणि महत्व ज्यांना शेतीची माहिती आहे त्यांना वेगळा सांगण्याची गरज नाही. वर्षभर शेतात काबाडकष्ट केल्यानंतर हाती आलेल्या पिकाचं खळं घालायचं (पुर्वी हे ़खळे अगदी  पंधरा पंधरा दिवस चालायचे) त्याची मळणी झाल्यानंतर शेतात धान्याचा  जो ढीग तयार होतो त्याला रास म्हणतात . हल्ली खळं करण्याची गरज नसते. मळणी यंत्राच्या माध्यमातून सारी काम होतात .. तरीही रास असतेच. लहान असताना खळयाला राखण राहणं, रात्री शेतात झोपायला जाणं याची मजा  वाटायची.. रास मोजायला पायलीचं माप असतं. जो गडी मापं मोजायचा.. ती मोजणी एक, दोन, तीन अशी व्हायची नाही. ती लाभं, बरकतं, न्यारं अशी मोजणी चालायची.. कदाचित आठचा आकडा अशुभ समजला जात असवा म्हणून रास मोजताना आठला, रामं हा पयाॅय म्हणून वापरला जात असावा. . या सारयाची मला मोठी गंमत वाटायची. मात्र गेली अनेक वर्षे पत्रकारिता करीत भटकंती होत राहिल्यानं रास बघायला मिळाली नव्हती. चार दिवसांपासून गावी असल्यानं गव्हाची रास पुन्हा अनुभवणयाची संधी मिळाली. कालची सायंकाळ शेतात राशीजवळ घालविली. लहान असतानाच्या सारया आठवणी जाग्या झाल्या.. सायंकाळ मजेत गेली.. गडी सांगत होते.. इतरांच्या तुलनेत आपल्याला “उतार” चांगला लागला.. मात्र वडील खूष नव्हते.. झालेला खर्च आणि आलेला गहू याचा मेळ बसत नाही असं ते म्हणत होते.. कोरडवाहू शेती म्हणजे आतबट्ट्याचा धंदा अशी स्थिती आहे.. तरीही ती करावी लागते.. ती सोडता येत नाही..विकता येत नाही.. कारण या काळ्या आईत शेतकरयाचया जीव अडकलेला असतो ना? अशा भावना आपल्या देवडी गावी आल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published.