Home » माझा बीड जिल्हा » राम बाजगिरे गरुजींचे कार्य प्रेरणादायी – आडसकर 

राम बाजगिरे गरुजींचे कार्य प्रेरणादायी – आडसकर 

राम बाजगिरे गरुजींचे कार्य प्रेरणादायी – आडसकर 

वडवणी दि ०९( प्रतिनिधी ) बालाघाटाच्या डोंगररांगांतील खडकी देवळा या दुर्गम भागात राम बाजगिरे गुरुजी यांनी संस्कारशील विद्यार्थी घडविण्याचे केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मा. रमेशरावजी आडसकर यांनी केले.
देवळा (ख.) ता. वडवणी जि. बीड येथील दयानंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात राम बाजगिरे यांच्या सेवापूर्ती समारोह कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश आडसकर, सचिव श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेसाहेब देशमुख शिक्षण व आरोग्य सभापती जि. प. बीड , गणेश शिंदे सभापती पं. स. वडवणी, प्राचार्य धुर्वे सर, श्री.सुर्वे सर, श्री. योगे सर, सुखदेव रेडे पं. स. सदस्य , महादेव रेडे , रावसाहेब डोंगरे माजी पं. स. सदस्य, राजाभाऊ करांडे सरपंच खडकी, श्री.बंडू डोंगरे,सतिष ( विक्रीकर अधिकारी बीड), पपेश पवार, राहुल करांडे आदींची उपस्थिती होती
प्रारंभी रमेश आडसकर राजेसाहेब देशमुख व सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक श्री बाजगिरे गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच देवळा परिसरातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीनेही बाजगिरे गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना रमेश आडसकर म्हणाले की , बाजगिरे गुरुजींनी या डोंगरदऱ्यातील विद्यार्थ्यांना उत्तमरीतीने घडविले. आज हे विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत गुरुजींचं कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे . राजेसाहेब देशमुख म्हणाले की स्व बाबुरावजी आडसकर यांनी डोंगरदऱ्यातील मुलांना शिक्षण देण्याची खूप तळमळ होती म्हणून त्यांनी देवळा येथे विद्यालय सुरू केले तात्यांच्या प्रेरणेने बाजगिरे गुरुजींनी पवित्र ज्ञानदानाचं कार्य करत संस्कारशील पिढी घडविली.सत्कारमूर्ती बाजगिरे गुरुजी म्हणाले की स्व. बाबुरावजी आडसकर यांनी या संस्थेत ज्ञानदान करण्याची संधी दिली हे मी माझे भाग्य समजतो. तात्यांची आम्हा शिक्षकांना खंबीर साथ असायची. यावेळी श्री. धुर्वे सर ,श्री. सुर्वे सर यांची समयोचित भाषणे झाली.या सेवापूर्ती समारोहात देवळा व परिसरातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सतिष डोंगरे( विक्रीकर अधिकारी ) ,बाळासाहेब जावळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लांमतुरे एस. एम सर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. गोविंद राऊत यांनी केले. सेवापूर्ती समारोहास देवळा व पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी नागरिक, पालक बहूसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.