Home » ब्रेकिंग न्यूज » एस.एम.देशमुखांनी केला बोअर खुला.

एस.एम.देशमुखांनी केला बोअर खुला.

देवडीकर सोसतात पाणी टंचाईच्या झळा.

एस.एम.देशमुखांनी केला बोअर खुला.

डोंगरचा राजा आँनलाईन / वडवणी

अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे आपल्या गावी आले आहेत गावातील नागरिक फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईच्या झळा सोसतांना पाहुन त्यांनी आपला मालकी बोअर खुला करुन कांही प्रमाणात का होईना नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
बीड जिल्हा आणि पाणी टंचाई हे नातं नवं नाही.बीड जिल्हयातील वडवणी तालुक्यात देवडी जवळपास साडेपाच ते सहा हजार लोकसंख्येचे गाव असुन या गावात सदैव पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो मात्र या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यास शासन तर सोडाच -प्रशासनाकडे सुध्दा याकामी वेळ नाही.किती दुर्लक्ष आहे याचा अनुभव सुध्दा देशमुख यांनी जवळुन अनुभवला.देवडी तर आहेच इतर गावे सुद्धा पाण्यासाठी प्रशासनाचे नावाने बोंब ठोकत आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच वरती विजेचा लपंडाव हाच पाणी टंचाईच्या झळा देण्यास अधिक तापदायक झाला आहे. देवडी या आपल्या मुळ गावी एस.एम.देशमुख यांनी सुदैवाने आपल्या गायवाडयात घेतलेल्या बोअरला मुबलक पाणी लागलेलं आहे.हे पाणी गावातील जनतेसाठी उपलब्ध करून दिल्यानं गावच्या गल्लीतील किमान शंभर कुटुंबांची तहान भागली आहे. देशमुख यांनी पुण्य वगैरे सोडा पण अनेकांची तहान भागविल्याचा आनंद व्यक्त केला आहे. येथील परिस्थिती स्वतः अनुभवली आणि कसलेही कारण समोर न आणता गावक-यांची तहान भागविण्यासाठी आपला मालकी बोअर केला खुला.बोअर सुरु केल्या नंतर पाण्यासाठी लागलेली लांबच्या लांब रांग पहावयास मिळाल्या.व गावातील नागरिकांनी सुध्दा आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.