Home » मनोरंजन » अनुष्काला फाळके फाऊंडेशन करणार सन्मानित

अनुष्काला फाळके फाऊंडेशन करणार सन्मानित

अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके फाऊंडेशन करणार सन्मानित

अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके फाऊंडेशन करणार सन्मानित

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी खूशखबर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. अनुष्का आज अनेकांची फेव्हरेट झाली आहे. एकीकडे ती सिनेमांमध्ये काम करते आहे. तर दुसरीकडे ती प्रोड्यूसर म्हणून अनेक सिनेमे बनवत आहे. अनुष्काने तिची प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म्सच्या बॅनरखाली अनेक सिनेमे प्रोड्यूस केले आहेत. या प्रोड्क्शन कंपनीला अनुष्काचा भाऊ कर्नीष शर्मा चालवतो. अनुष्काने प्रोड्यूस केलेले सिनेमे आतापर्यंत एक वेगळा कंटेन्ट असलेले ठरले आहे.

दादासाहेब फाळके फाऊंडेशन अॅवॉर्ड

फिल्लौरी,  NH10 आणि परी सारखे सिनेमे तिने प्रोड्यूस केले आहेत. यामुळेच अनुष्काला पाथ ब्रेकिंग प्रोड्यूसर म्हणून सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके फाउंडेशन अनुष्काला हा सन्मान देणार आहे. सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार नाही आहे. ही एक संस्था आहे जी अनुष्काला सन्मानित करणार आहे. अनुष्काच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कामगिरी केली. सिनेमांमध्ये ती लीड रोलमध्ये होती आणि सिनेमे प्रोड्यूस देखील केले. तिच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण असणार आहे. अनुष्का लवकरच वरुण धवन सोबत सुई धागा सिनेमामध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.