Home » महाराष्ट्र माझा » शिवाजी राजा जगातील पहिला राजा -मा.न्या.कोळसे

शिवाजी राजा जगातील पहिला राजा -मा.न्या.कोळसे

शिवाजी राजा जगातील पहिला राजा -मा.न्या.कोळसे

माजलगाव / आँनलाईन डोंगरचा राजा
प्रजेसाठी राज्यात लोकशाही राबवणारा जगात पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज होय,असे माजलगाव येथील सार्वजनिक फुले-आंबेडकर जन्मोत्सवाचे दि.७ शनिवार रोजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन माजी. न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मोहनराव सोळंके हे होते. तर प्रमुख पाहुणे जयंती उत्सव समितिचे अध्यक्ष माजीमंत्री प्रकाश सोळंके,बाबुराव पोटभरे,दयानंद स्वामी,अशोक डक,विजय साळवे व इतर उपस्थित होते.
पुढे बोलतांना कोळसे पाटील म्हणाले,नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा खूनातील आरोपी असून देखील ते देशाचे नेते आहेत हे गुन्हेगार असताना ते देशाचे प्रधानमंत्री होतात हे त्या संघ या विषारी संघटनेमुळे असल्याचे यावेळी बोलतांना म्हणाले,तर भीमा कोरेगाव प्रकरण हे संघशासीत भाजपचा कुटिल डाव आहे त्यांना दोन समाजात दुही निर्माण करुन भांडण लावण्याचं काम हे जातीयवादी करीत आहेत.संघशासीत भाजपला देशाचे मौलिक संविधान मान्य नसून ते मनुस्मृती आणण्याचे कारस्थान चालवले आहे.देशात दलित,मुस्लिम व इतर समाजातील गरिब लोकांवर रोज अन्याय होत आहेत. जे मरणाला घाबरतात त्यांना जगण्याचा अर्थ नाही. संविधान मान्य नसणार्‍या लोकांनी आज देशावर कब्जा केला आहे.देशातील शैक्षणिक,आर्थिक, राजकिय,धार्मिक या मुख्य जागा या जातियवादी लोकांनी काबिज केल्या आहेत.देशातील सर्व सामांन्यांकडून जास्त कर वसुल केल्या जात आहे. जगात भारत देश हा एकमेव आहे.जो गरिबांकडुन जास्त कर वसुल केला जातो.देशातील ७५% पैसा हा देशातिल भांडवलदारांकडे आहे असे ते म्हणाले.मी जे सांगतो ते पुराव्यानुसार सांगतो.मोदी हटाव,इव्हिएम हटाव,देश बचाव हे सर्वांनी लक्षात ठेवुन नागरिकांनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवा.त्याप्रमाणे आंदोलन करने ही  काळाची गरज आहे.कार्यक्रमाची हिच शपथ सर्व नागरिकांना देवुन हा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात प्रकाश सोळंके,बाबुराव पोटभरे, विजय साळवे इतर यांनी थोडक्यात भाषणे केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद स्वामी यांनी केले.तर सुत्रसंचालन संजय बागुल यांनी केले.तर आभार मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.